धाराशिव – आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भोसले हायस्कूल समोरील मैदान शासनाने विद्यार्थासाठी क्रीडांगणासाठी दिले असताना, त्यावर शाळेची अनाधिकृत बिल्डिंग उभी करण्यात आली, याप्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्याकडे अहवाल मागितला असता, त्यांनी माहितीच दिली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी वसुधा फड यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भोसले हायस्कूल समोरील मैदान शासनाने विद्यार्थासाठी क्रीडांगणासाठी दिले असताना, त्यावर शाळेची अनाधिकृत बिल्डिंग उभी करण्यात आली आहे, त्याविरुद्ध तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी भोसले हायस्कूल विरुद्ध निकाल दिला होता, ही जागा शासनाची जागा असल्याचा निर्वाळा दिला होता.त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी शाळेचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश नगर परिषदेला दिले होते. त्यानंतर सुधीर पाटील यांनी महसूल मंत्र्याकडे धाव घेतली असता, अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम आणि त्यावरील व्याज भरण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला देखील सुधीर पाटील यांनी केराची टोपली दाखवली आहे.त्यानंतर देखील सुधीर पाटील यांनी प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा जिल्हा प्रशासनाची मान्यता न घेताच उभा केला असून, त्याचे अनावरण काही दिवसापूर्वी करण्यात आले आहे.
याप्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्याकडे अहवाल मागितला असता, त्यांनी माहितीच दिली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी वसुधा फड यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपण वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत नसल्याने आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करू नये ? अशी विचारणा देखील करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी वसुधा फड यांनी धाराशिव पालिकेत अनेक गैरव्यवहार आणि गैरप्रकार केले असून, वरिष्ठ अधिकाऱ्याना देखील त्या जुमानत नाहीत, त्यांच्या या मुजोरीबद्दल शासन काय कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.