• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

admin by admin
July 31, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
470
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ मारामारीत झाले. ही घटना धाराशिव तालुक्यातील सुर्डी शिवारात घडली असून, याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्डी येथील शेत गट क्रमांक २१३ मध्ये २७ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पहिल्या घटनेत, कमल गोवर्धन माळी (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे म्हशीचे वासरू शेतात आल्याच्या कारणावरून बाळू दगडू माळी, दगडू पांडुरंग माळी आणि जया दगडू माळी यांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकीही दिली. या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या घटनेत, जयश्री दगडू माळी (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, म्हशीचे वासरू सोयाबीनच्या पिकात का सोडले, असे विचारल्याचा राग मनात धरून गोवर्धन पांडुरंग माळी, कमल गोवर्धन माळी आणि मारुती गोवर्धन माळी यांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

दोन्ही पक्षांनी ३० जुलै रोजी दिलेल्या तक्रारींच्या आधारे, धाराशिव ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटांतील आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), (३), ३(५)) गुन्हे दाखल केले आहेत. एकाच घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

भूम : ७० वर्षीय वृद्ध महिलेवर तरुणाचा लैंगिक अत्याचार

Next Post

उमरग्यात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरग्यात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!