धाराशिव : फिर्यादी नामे- सुनिल चंद्रकांत आंबेकर, वय 40 वर्षे, रा. समता नगर 11 नं शाळेसमोर धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे रहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 17.05.2024 रोजी 22.00 ते दि. 18.05.2024 रोजी 06.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन लोखंडी कपाटातील 36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचा पंचपाळ, छल्ला, आरत्या, लक्ष्मीची मुर्ती, वाळे, पैजन असा एकुण 1,44,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनिल आंबेकर यांनी दि.18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे- आकाश दत्तात्रय मुळे, वय 24 वर्षे, रा.काळेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे रहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 17.05.2024 रोजी 23.00 ते दि. 18.05.2024 रोजी 06.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 5,000 ₹ नउ साड्या, मोबाईल फोन असा एकुण 58,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आकाश मुळे यांनी दि.18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे-सहदेव हनुमंत मिसाळ, वय 29 वर्षे, रा. कोंबडवाडी, ता.जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 7750 ही दि. 16.05.2024 रोजी 19.00 ते दि. 17.05.2024 रोजी 07.00 वा. सु. सहदेव मिसाळ यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सहदेव मिसाळ यांनी दि.18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.