नळदुर्ग : मयत नामे-शंभुहरी प्रकाश धनवडे, व जखमी नामे- रियाज नुरअहमद शेख दोघे रा.उळेवाडी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर हे दि.07.12.2023 रोजी 18.30 वा. सु. जळकोट वरुन एनएच 65 रोडवरुन मोटरसायकलवरुन गावी परत जात होते. दरम्यान मुर्टा पाटीजवळ ट्रक क्र एमएच 10 सीआर 5367 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून शंभुहरी धनवडे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात शंभुहरी धनवडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर रियाज शेख हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ नामे- गोपाळ प्रकाश धनवडे, वय 32 वर्षे, रा. उळेवाडी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.08.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : मयत नामे-दिपक शिवाजी तोडकर, वय 23 वर्षे, व जखमी नामे- रोहीत सोमेश्वर मोदी दोघे रा.गणेश नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.02.12.2023 रोजी 04.45 ते 05.00 वा. सु. हे स्कुटी क्र एमएच 25 एटी 6754 वर बसुन हॉटेल मेघ मल्हार भोजनालय धाराशिव येथुन जात होते. दरम्यान अज्ञात एस.टी. चालकाने त्याचे ताब्यातील बस ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून दिपक तोडकर यांचे स्कुटीला ओव्हर टेक करत असताना नमुद स्कुटी ला बसचा धक्का लागून स्कुटी खाली पडल्याने मयत नामे- दिपक तोडकर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर रोहीत मोदी हा किरकोळ जखमी झाला. अशा मजकुराच्या मयताचे वडील-शिवाजी नागनाथ तोडकर, वय 49 वर्षे, रा. भवानी चौक गणेश नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.08.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
धाराशिव :आरोपी नामे- 1) यशराज सुर्यवंशी, 2)रोहन रायबान, 3) रोहीत जाधव सर्व रा. धाराशिव ता. जि.धाराशिव यांनी दि.08.12.2023 रोजी 20.00 वा. सु. एमआयडीसी मधील आरटीओ ऑफीसकउे जाणारे रोडवर विर शिवा काशीद चौकात फिर्यादी नामे-पार्थ संतोष गोरे, वय 18 वर्षे, रा. तुळजापूर नाका आयुर्वेदिक कॉटर्स धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गर्लफ्रेंडला बोलण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, फायटरने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- पार्थ गोरे यांनी दि.08.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.