उमरगा : फिर्यादी नामे-संदीप मुरलीधर देशपांडे, वय 52 वर्षे, रा. डिग्गी रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि. 06.12.2023 रोजी उमरगा बायपास अत्तार पेट्रोल पंपाच्या पुढे रोडवरून वॅगीनार गाडी मधून जात होते. दरम्यान संदीप देशपांडे यांनी नैसर्गिक विधी साठी गाडी थांबवून पुन्हा गाडीत बसत असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांचा गळा दाबून मारहाण करुन जिवे मारण्याची प्रयत्न करुन त्यांचे कडील रोख रक्कम 10,000₹ व दोन मोबाईल फोन असा एकुण 25,000₹ किंमतीचा माल व गाडीची चावीसह लटून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संदीप देशपांडे यांनी दि.08.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 394, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : फिर्यादी नामे-जनाबाई चंद्रकांत सुर्यवंशी, वय 50 वर्षे, रा. तोरंबा, ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.08.12.2023 रोजी 01.30 ते 02.30 वा. सु.तोडून आत प्रवेश करुन घरातील डब्यात ठेवलेले 45.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, पर्समधील रोख रक्कम 1,30,000₹,व मोटरसायकल असा एकुण 3,95,000₹ किंमतीचा माल चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जनाबाई सुर्यवंशी यांनी दि.08.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे- दयानंद त्रंबक मुळुक, वय 50 वर्षे, रा. नांदुरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे दि. 06.11.2023 रोजी 19.00 ते दि. 07.11.2023 रोजी 08.00 वा. पुर्वी काळेगाव शिवारात शेत गट नं 140 मधील लक्ष्मी कंपनीचे ट्रेलर चेसी नं AibSI1671 असा किमंत अंदाजे 70,000₹ हा अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दयानंद मुळुक यांनी दि.08.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-प्रतिक चंद्रकांत माने, वय 23 वर्षे, रा. सकनेवाडी ता. जि. धाराशिव यांचे भारत पेट्रोल पंपाचे समोर धाराशिव येथील कपड्याचे दुकानाचे अज्ञात व्यक्तीने दि. 07.12.2023 रोजी 21.00 ते दि. 08.12.2023 रोजी 09.30 वा. सु. पत्रा उचकटून आत प्रवेश करुन साड्या, टी-शअर्, जिन्स पॅन्ट, लहान मुलांचे शर्ट, परकर, लहान मुलांचे ड्रेस असा एकुण 72, 750 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रतिक माने यांनी दि.08.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे- अर्जुन रोहीदास अडसुळ, वय 50 वर्षे, रा. नवोदय विदयालय शेजारी नळदुर्ग रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 25, 000₹ किंमतीची काळ्या रंगाची होन्डा शाईन कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एबी 4881 ज्याचा चेसी नं- ME4JC36JEE7902721 व इंजिन नं- JC36 E73444766 ही दि. 05.12.2023 रोजी 13.00 ते 17.40 वा. सु. नगर परिषद शेजारी जाधव कॉम्पलेक्स येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अर्जुन अडसुळ यांनी दि.08.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.