धाराशिव :आरोपी नामे-1)अमोल लोमटे, 2) अनिकेत गवाड, 3) प्रदिप दांगट सर्व रा.खेड ता. जि. धाराशिव यांनी दि. 15.10.2023 रोजी 19.00 वा. सु. ते दि. 26.10.2023 रोजीचे 13.30 वा. सु. शिंगोली येथील कंपनीचे गोडावून येथुन ता.जि. धाराशिव फिर्यादी नामे- लक्ष्मण भिमराव पाचकुडवे, वय 34 वर्षे, व्यवसाय- मॅनेजर सनशाईन ॲडवटांझींग कंपनी, रा. एस. टी. कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे नमुद आरोपींनी सनशाईन ॲडवटांझींग कंपनीमध्ये निवडणुक प्रचारासाठी एल.ए.डी. व्हॅन क्रमांक एमएच 12 एन एक्स 0464 ही मध्यप्रदेश येथे पाठविण्यात आले असता व्हॅन मधील सामानाचे परस्पर व्हीलेवाट लावून एकुण 2, 36, 100 ₹ किंमतीच्या सामानचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे लक्ष्मण पाचकूडवे यांनी दि.02.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 420, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद
येरमाळा : येरमाळा पो.ठा. चे पथक दि. 01.04.2024 रोजी 21.00 वा. सु. येरमाळा पो.ठा. हद्दीत येरमाळा येथे रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना येरमाळा बसस्थानक समोर ता. पानगाव ता. कळंब जि. धाराशिव येथील-रामेश्वर शिवाजी शिंदे, वय 29 वर्षे, हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे विना परवाना स्वत:चे कब्जात एक तलवार बेकायदेशीररीत्या मोटार सायकल क्र एमएच 14 ईडी 8536 वरुन हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. सध्या धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे शस्त्र बंदी आदेश क्र जा. क्र 24/उप चिटणीस/ एम.ए.जी.-3/ कावि-154 दि. 21.03.2024 अन्वये कलम 37(1)(3) आदेश अन्वये माहित असताना देखील तलवार बाळगून मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे आदेशाचे उल्लंघन केले आहे. यावर पथकाने आरोपी यास ताब्यात घेउन त्याच्याजवळील ती तलवार जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम 188, शस्त्र कायदा कलम- 4, 25, मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.