• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जलजीवन मिशनच्या दीड कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘बोंबाबोंब’; धाराशिव जि.प. समोर गावकऱ्यांचा एल्गार

लोहारा तालुक्यातील खेड येथील धक्कादायक प्रकार; कामे कागदोपत्रीच, महिला केंद्राची इमारतही गायब

admin by admin
December 30, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
जलजीवन मिशनच्या दीड कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘बोंबाबोंब’; धाराशिव जि.प. समोर गावकऱ्यांचा एल्गार
0
SHARES
356
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : लोहारा तालुक्यातील खेड येथे जलजीवन मिशन आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संतप्त गावकऱ्यांनी आज थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ‘बोंबाबोंब’ आंदोलन केले. दीड कोटी रुपयांच्या या कथित घोटाळ्यात कारवाईसाठी वर्षभर उंबरठे झिजवूनही दाद न मिळाल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर झाला होता. अखेर प्रशासनाने चौकशी समिती नेमून स्थळ पाहणीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

नेमके प्रकरण काय?

लोहारा तालुक्यातील खेड येथे जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. ग्रामसेवक, अभियंता आणि गट विकास अधिकारी यांनी संगनमत करून कामे न करताच किंवा निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाची फसवणूक केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

  • सार्वजनिक शौचालय व नळ शिफ्टिंग: शौचालयासाठी ७ लाख व नळ कनेक्शनसाठी ४.५० लाख मंजूर झाले, मात्र काम न करताच बोगस एमबी (MB) तयार करून बिले उचलण्यात आली.

  • शाळेचे कंपाउंड: वॉल कंपाउंडचा ठराव असताना अभियंत्यांनी फक्त तारेचे कुंपण केले. यासाठी १.७५ लाखांचा निधी खर्ची पडला, तरीही काम अत्यंत निकृष्ट आहे.

  • पाण्याची टाकी व पाईपलाईन: बांधलेल्या पाण्याच्या टाकीला भेगा पडल्या असून ती कोसळण्याची भीती आहे. पाईपलाईनसाठी फक्त खोदाई केली, पण पाईप टाकलेच नाहीत.

  • महिला केंद्र: सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावात महिला केंद्राची इमारत अस्तित्वात नसतानाही, ती बांधल्याचे दाखवून त्याचे बिल उचलण्यात आले आहे.

प्रशासनाची धावपळ आणि आश्वासन

गेल्या वर्षभरापासून समाजसेवक अण्णाराव कांबळे आणि गावकरी कारवाईसाठी पाठपुरावा करत होते. मात्र, प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने आज आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांच्या दालनासमोरच ठिय्या देत दोन तास बोंबाबोंब आंदोलन केले. यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांच्या अध्यक्षतेखालील समिती खेड येथे जाऊन प्रत्यक्ष कामांची आणि दर्जाची पाहणी करेल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात अण्णाराव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य जया कांबळे, सीमा गायकवाड, सुदर्शन गव्हाळे, शिवा गायकवाड, दिलीप कांबळे, बालाजी कांबळे, गौतम गायकवाड, बळीराम बनसोडे, पप्पू गायकवाड, सुरज कांबळे, अण्णा कांबळे व बाळू सुरवसे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Previous Post

भूम तालुक्यातील वालवड येथे ३४ हजारांचा अवैध गुटखा जप्त; साई प्रोव्हिजन स्टोअर्सवर पोलिसांचा छापा

Next Post

मुलीच्या लग्नासाठी घेतलेले पैसे बुडवणे भोवले; खोट्या धनादेश प्रकरणी मित्राला ६ महिने कारावास आणि अडीच लाखांचा दंड

Next Post
कळंब – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप

मुलीच्या लग्नासाठी घेतलेले पैसे बुडवणे भोवले; खोट्या धनादेश प्रकरणी मित्राला ६ महिने कारावास आणि अडीच लाखांचा दंड

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवमध्ये मिरवणुकीत कानठळ्या बसवणाऱ्या ‘डॉल्बी डीजे’वर पोलिसांची कारवाई; सोलापूरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर बसस्थानकावर पुन्हा धाडसी चोरी! नांदेड बसमध्ये चढताना सोलापूरच्या महिला भाविकाचे ५० हजारांचे मिनीगंठण लंपास

June 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात दोन ठिकाणी टोळक्यांचा राडा! लग्नाच्या कार्यक्रमात बिअरची बाटली अन् लोखंडी पाईपने मारहाण; १४ जणांवर गुन्हे दाखल

June 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धक्कादायक! धाराशिवमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर ७ वर्षे अत्याचार; जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

June 2, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

वाशी तालुक्यात विजोरा शिवारात पोलिसांची मोठी कारवाई; पत्राच्या शेड शेजारील कडब्याखाली लपवलेली तलवार जप्त, एकावर गुन्हा दाखल

June 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group