• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना!” काल टाकलेला स्लॅब आज खुद्द गुत्तेदाराच्याच वाहनाने कोसळला

admin by admin
August 11, 2026
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
“निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना!” काल टाकलेला स्लॅब आज खुद्द गुत्तेदाराच्याच वाहनाने कोसळला
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It
धाराशिव: शहरातील जुना उपळा रोडवरील जीवघेण्या खड्ड्याबाबत काल (सोमवारी) नागरिकांनी होर्डिंग लावून संताप व्यक्त केल्यानंतर, गुत्तेदाराने अवघ्या ५ तासांत खड्डा बुजवला. मात्र, या घाईघाईत केलेल्या ‘निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना’ आज लगेचच पाहायला मिळाला. काल टाकलेला हा स्लॅब आज खुद्द गुत्तेदाराच्याच काँक्रिट मिक्सर वाहनाच्या वजनाने कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

होर्डिंग आंदोलनानंतर घाईघाईत उरकले काम

जुना उपळा रोडवरील सर्व्हिस रोडजवळ एक महिना उलटून गेला तरी स्लॅब पडलेला नव्हता. उघड्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी काल (सोमवारी) थेट गुत्तेदाराच्या नावाने “मला अजून एक बळी पाहिजे…” असे उपहासात्मक होर्डिंग लावले होते. धाराशिव लाइव्हने याबाबत सर्वप्रथम बातमी प्रकाशित करताच प्रशासनाला जाग आली. यानंतर ‘धाराशिवच्या लाडक्या गुत्तेदाराने’ तात्काळ सूत्रे हलवली आणि अवघ्या ५ तासांत तो खड्डा बुजवून त्यावर स्लॅब टाकला.

अन् गुत्तेदाराच्याच वाहनाने फोडला स्लॅब

आज त्याच सर्व्हिस रोडला असलेल्या नाल्याजवळ (जिथे ७ फूट खोल खड्डा आहे) पॅराफिट वॉलचे काम सुरू होते. यावेळी गुत्तेदाराची एक काँक्रिट मिक्सर गाडी काल टाकलेल्या नव्या स्लॅबवरून गेली. कामाचा दर्जा इतका निकृष्ट होता की, या गाडीच्या वजनाने तो नवीन स्लॅब लगेचच तुटून कोसळला.

ड्रायव्हरचा पळ; नागरिकांकडून व्हिडीओ चित्रीकरण

स्लॅब कोसळल्याचे पाहताच स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत हे निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवले. नागरिकांनी काँक्रिट मिक्सरच्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र, ड्रायव्हरने नागरिकांचे न ऐकता गाडीसह तेथून पळ काढला. सुदैवाने, स्थानिक नागरिकांनी सजगता दाखवत गाडी पळून जात असतानाचे मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडीओ चित्रीकरण केले आहे.

पुन्हा थातूरमातूर कामाचा घाट

ड्रायव्हर पळून गेल्यानंतर आता पुन्हा त्याच ठिकाणी कोसळलेला स्लॅब लपवण्यासाठी आणि निकृष्ट कामाचा आणखी एक ‘उत्कृष्ट नमुना’ सिद्ध करण्यासाठी गुत्तेदाराकडून पुन्हा थातूरमातूर काम सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित गुत्तेदारावर कठोर कारवाई करण्याची आणि कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Previous Post

‘तेरणा’त राबा अन् भाजयुमोचं पद मिळवा! ६ महिन्यांत ३ अध्यक्ष आणि साहेबांचा ‘गिनीज’ विक्रम!

Next Post

गुरुजी रस्त्यावर, ‘माऊली’ परदेशात आणि झेडपीची सर्वसाधारण सभा अचानक ‘हवेत’!

Next Post
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

गुरुजी रस्त्यावर, 'माऊली' परदेशात आणि झेडपीची सर्वसाधारण सभा अचानक 'हवेत'!

ताज्या बातम्या

‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!

September 26, 2026
टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

September 26, 2026
ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

September 26, 2026
धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

September 25, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश

September 24, 2026

Recent Posts

  • गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!
  • टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!
  • ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’
  • धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड
  • गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!