• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशीतील म्हशी चोरीचे फलटण-बारामती कनेक्शन उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, तिघे जेरबंद

admin by admin
November 28, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशीतील म्हशी चोरीचे फलटण-बारामती कनेक्शन उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, तिघे जेरबंद
0
SHARES
397
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या म्हशींचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सातारा आणि पुणे जिल्ह्यातील तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या तीन म्हशी आणि पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे चोरटे आजच या म्हशी बारामती बाजारात विकण्याच्या तयारीत होते, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे पथक जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते. पेट्रोलिंग दरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून वाशी पोलीस ठाण्यातील (गुन्हा र.नं. ३९०/२०२५, कलम ३०३(२) बीएनएस) गुन्ह्यातील संशयित निष्पन्न झाले.

तपासाची चक्रे फिरवत पथकाने मुख्य आरोपी रविंद्र उर्फ बुठा ठकसेन रायते (वय ३३, रा. कणसे वस्ती, गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने त्याचे साथीदार ऋषीकेश बिंटु जगताप (रा. गोखली, ता. फलटण) आणि राहुल सुभाष सपकाळ (रा. सोनगाव, ता. बारामती, जि. पुणे) यांच्या मदतीने ही चोरी केल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी इतर दोन आरोपींनाही ताब्यात घेतले.

आरोपींकडे चोरीच्या म्हशींबाबत चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, “म्हशी रविंद्र रायते याच्या घरासमोरील झाडीमध्ये बांधून ठेवल्या असून, आज त्या बारामती येथील बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार आहोत.” पोलिसांनी तातडीने गुणवरे (ता. फलटण) येथे जाऊन छापा टाकला. तेथून चोरीस गेलेल्या ३ म्हशी आणि गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विनोद इज्जपवार, स.पो.नि. सचिन खटके, पोलीस अंमलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर आणि चालक प्रशांत किवंडे यांच्या पथकाने केली.

 

 

Previous Post

लोहारा तालुक्यात थरार! वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन १३ वर्षीय मुलाचे अपहरण; बीडच्या चौघांवर गुन्हा

Next Post

चिंचा झाडण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; दगडाने मारहाण करत फोडले डोके, तांदुळवाडी येथील घटना

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

चिंचा झाडण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; दगडाने मारहाण करत फोडले डोके, तांदुळवाडी येथील घटना

ताज्या बातम्या

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group