• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लोहारा तालुक्यात थरार! वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन १३ वर्षीय मुलाचे अपहरण; बीडच्या चौघांवर गुन्हा

admin by admin
November 28, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका
0
SHARES
386
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा: “मुलाला आमच्यासोबत पाठव, नाहीतर तुला जिवे मारून टाकू,” अशी धमकी देत वडिलांच्या डोळ्यादेखत १३ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना लोहारा तालुक्यातील करजगाव शिवारात घडली आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांवर लोहारा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील फिर्यादी बाळू वसंत भोजराव (वय ५२, रा. हिप्परगा सय्यद, ता. लोहारा) यांचा मुलगा सागर बाळू भोजराव (वय १३) याचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास करजगाव शिवारातील नागु पवार यांच्या शेतातील गोठ्यात घडली.

आरोपी नवनाथ कदम, शुभम नवनाथ कदम, सुमित्रा नवनाथ कदम (सर्व रा. सिरसदेवी, ता. गेवराई, जि. बीड) आणि अभिषेक अशोक म्हस्के (रा. राक्षसभुवन, जि. बीड) हे चौघे फिर्यादीच्या गोठ्यावर आले. त्यांनी फिर्यादी बाळू भोजराव यांना धमकावत, “तुमच्या मुलाला आमच्यासोबत पाठवा, अन्यथा तुम्हाला जिवे ठार मारू,” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी अल्पवयीन सागरला बळजबरीने गाडीत बसवून पळवून नेले.

या घटनेनंतर तब्बल दीड महिन्यांनी, म्हणजेच २७ नोव्हेंबर २०२५ रोजी बाळू भोजराव यांनी लोहारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वरील चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३४ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.

 

Previous Post

पेट्रोल पंप मिळवून देण्याच्या बहाण्याने ३८ लाखांचा गंडा; तांबेवाडी येथील व्यक्तीची सायबर चोरट्यांकडून फसवणूक

Next Post

वाशीतील म्हशी चोरीचे फलटण-बारामती कनेक्शन उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, तिघे जेरबंद

Next Post
वाशीतील म्हशी चोरीचे फलटण-बारामती कनेक्शन उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, तिघे जेरबंद

वाशीतील म्हशी चोरीचे फलटण-बारामती कनेक्शन उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, तिघे जेरबंद

ताज्या बातम्या

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group