• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, December 17, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मशाल, कमळ की तुतारी? लढत होणार ‘काटे की टक्कर’

निकालासाठी २१ डिसेंबरची प्रतीक्षा; उमेदवारांची धाकधूक वाढली!

admin by admin
December 3, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव नगर परिषद निवडणूक २०२५: नगराध्यक्षपदासाठी १३ उमेदवार रिंगणात; वैध उमेदवारांची यादी जाहीर
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी शांततेत पण चुरशीने मतदान पार पडले. ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले असले तरी, निकालासाठी मात्र २१ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. मतदानानंतर आता उमेदवारांसह मतदारांचीही धाकधूक वाढली असून, ‘शहराची कारभारीन ‘ कोण होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मशाल, कमळ की तुतारी? लढत होणार ‘काटे की टक्कर’

नगराध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव होते. या प्रतिष्ठेच्या जागेसाठी एकूण सहा महिला उमेदवार रिंगणात उतरल्या होत्या. सर्वच उमेदवारांनी आपापल्या परीने जोर लावला असला तरी, खरी आणि थेट लढत ही शिवसेना (ठाकरे गट) , भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातच पाहायला मिळाली.

ठाकरे गटाकडून सौ. संगीता सोमनाथ गुरव , भाजप कडून नेहा काकडे आणि शरद पवार गटाकडून सौ. परवीन खलिफा कुरेशी यांच्यात ‘काटे की टक्कर’ झाल्याचे चित्र आहे. शहरातील प्रबुद्ध मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे, हे २१ डिसेंबरलाच स्पष्ट होईल. तोपर्यंत दोन्ही गटांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

नगरसेवकपदासाठी २०१ जणांचे नशीब ईव्हीएममध्ये बंद

केवळ नगराध्यक्षपदच नव्हे, तर नगरसेवकपदासाठीही मोठी चुरस निर्माण झाली होती. नगर परिषदेच्या ३९जागांसाठी तब्बल २०१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रत्येक प्रभागात एका-एका मतासाठी उमेदवारांनी अटीतटीची लढत दिली आहे. गल्लीबोळात आणि वॉर्डावॉर्डात स्थानिक समीकरणे जुळवताना उमेदवारांची दमछाक झाली.

निकालाची प्रतीक्षा जीवघेणी

मतदान होऊन गेले असले तरी निकालाची तारीख लांबणीवर पडल्याने उमेदवारांची अवस्था ‘धोबी का कुत्ता, न घर का न घाट का’ अशी झाली आहे. २१ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने पुढील दोन आठवडे उमेदवारांसाठी अत्यंत तणावाचे जाणार आहेत. कोण गुलाल उधळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उर्वरित तीन जागेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यात किती उमेदवार रिंगणात उतरतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात सरासरी ६८.९७ टक्के मतदान; तुळजापूर ‘टॉप’ तर धाराशिव ‘तळाला’, २१ डिसेंबरला फुटणार निकालाचे फटाके!

Next Post

येडशीत हॉटेल चालकाला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येडशीत हॉटेल चालकाला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलांनीच पकडले चोरट्यांना; गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचा ८ तास विलंब, महिलांचा संताप

तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलांनीच पकडले चोरट्यांना; गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचा ८ तास विलंब, महिलांचा संताप

December 17, 2025
तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

‘सत्ते’चा माज की पराभवाची भीती? तुळजापुरात राणा पाटलांच्या पोसलेल्या गुंडांचा नंगानाच!

December 17, 2025
तुळजापूरची अवस्था बिहारपेक्षा वाईट! माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर यांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

तुळजापूरची अवस्था बिहारपेक्षा वाईट! माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर यांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

December 16, 2025
तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

December 16, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात दोन गटात जोरदार राडा; पिटू गंगणे आणि ऋषी मगर भिडले… , वाहतूक ठप्प…

December 16, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group