• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव पालिकेत प्रशासकीय घोळ: मुख्याधिकारी रजेवर, प्रभारी अधिकाऱ्याची त्याच दिवशी बदली

admin by admin
June 25, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड या वादग्रस्त पार्श्वभूमीवर दीर्घ रजेवर गेल्या असतानाच, त्यांचा पदभार सांभाळण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याची त्याच दिवशी बदली झाल्याने धाराशिव पालिकेतील प्रशासकीय पेच वाढला आहे. या घटनेमुळे पालिकेतील १४० कोटींच्या रस्ते निविदेचा वाद आणि आगामी निवडणुकीच्या प्रभाग रचनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सोमवारी पालिका मुख्याधिकारी वसुधा फड दीर्घ रजेवर गेल्या. गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या फड यांनी प्रथमच दीर्घ रजा घेतली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर होणारी प्रभाग रचना आणि १४० कोटी रुपयांच्या रस्ते कामाच्या निविदेवरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रजेमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. या निविदेला अंदाजपत्रकीय किमतीनुसार मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे पालकमंत्र्यांनी ही प्रक्रिया रद्द केल्याचे म्हटले होते. मात्र, याबाबत कोणतेही लेखी आदेश नसल्याने संपूर्ण प्रक्रियेत संभ्रम कायम आहे. फड या आजारपणामुळे रजेवर गेल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी, त्या बदलीसाठी प्रयत्नशील असल्याचीही चर्चा आहे.

फड यांच्या रजेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा पदभार नगर प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त अजितकुमार डोके पाटील यांच्याकडे सोपवला होता. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी डोके यांच्याकडे पदभार येण्याची शक्यता होती, त्याच दिवशी, म्हणजेच २४ जून २०२५ रोजी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने एक आदेश काढून त्यांची बदली केली आहे.

शासनाच्या आदेशानुसार, धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील गट-ब संवर्गातील सहायक आयुक्त असलेले अजितकुमार डोके यांची प्रशासकीय कारणास्तव लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्याच पदावर रिक्त जागी बदली करण्यात आली आहे. त्यांना २४ जून २०२५ रोजी दुपारपासून कार्यमुक्त करण्यात आले असून , २५ जून २०२५ रोजी लातूर येथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एकीकडे मुख्याधिकारी दीर्घ रजेवर आणि दुसरीकडे त्यांचा प्रभार घेण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्याची त्याच दिवशी बदली, या दुहेरी योगायोगाने धाराशिव पालिकेच्या कारभारात मोठी प्रशासकीय पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे पालिकेतील वादग्रस्त निविदा आणि इतर महत्त्वाच्या कामांचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Previous Post

 विठ्ठलाचे संत आणि त्यांचे कार्य

Next Post

संत ज्ञानेश्वर: चमत्कार आणि त्यामागील लोककल्याणाची भूमिका

Next Post
संत ज्ञानेश्वर: चमत्कार आणि त्यामागील लोककल्याणाची भूमिका

संत ज्ञानेश्वर: चमत्कार आणि त्यामागील लोककल्याणाची भूमिका

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026
धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!