• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, April 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा

आ. सुरेश धस यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

admin by admin
November 10, 2023
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील बोगस गुंठेवारी प्रकरणी चार दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास मुख्याधिकारी वसुधा फड या टाळाटाळ करीत असल्याने या प्रकरणी त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

नगर पालिकेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या कार्यकाळात एकूण १३१४ गुंठेवारी फाईल्स मंजूर झाल्या असून पैकी १३४ बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने गुंठेवारी करून लेआऊट मंजूर करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकरणात भूखंडाचे सर्व्हे मधील स्थान दर्शवणारा मोजणी नकाशा नसल्याने व काही प्रस्तावामध्ये कच्चा रेखांकन नकाशा नसल्याने मंजूर विकास योजनेमध्ये प्रस्तावाअंतर्गत भूखंडाचे निश्चित होत नाही. तसेच काही संचिकांमध्ये मूळ मालक यांच्याकडील क्षेत्रामध्ये १० टक्के जागेचे क्षेत्र हस्तांतरित न करता गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरणाची कार्यवाही करण्यात आली आहे.

तसेच रद्द केलेल्या रेखांकन प्रस्तावास मंजुरी देणे, बांधकामाचे विकास शुल्क न आकारणे, मूळ मालकाचे नावे गुंठेवारी करणे, खरेदीदार व्यक्तिरिक्त इतरांचे नावे गुंठेवारी करणे, भोगवटदार वर्ग २ चे जमिनीचे विभाजन करून गुंठेवारी करणे, बेकायदेशीर बांधकाम नियमित करणे, बांधकामाचे अधिमूल्य न आकारणे, विकास शुल्कात ५० टक्के सवलत देणे आदी गैरव्यवहार करण्यात आले आहेत. तसेच गुंठेवारी नियमाधिन केलेल्या परवानगीची प्रत जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास पाठवण्यात आली नाही. काही प्रस्तावात ५० टक्के सूट देण्यात आली असली तरी उर्वरित रक्कम देखील नगर पालिकेत जमा झाली नाही.

या गैरव्यवहार प्रकरणी चार कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी वसुधा फड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, नगर अभियंता भारत विधाते, लिपिक गोरोबा आवचार , स्थापत्य अभियंता दत्तात्रय कवडे यांचा समावेश आहे. सात दिवसाच्या आत खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली होती. भादंवि १८६० चे कलम १६६, ४०९ प्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा का दाखल करू नये ? अशी विचारणा देखील करण्यात आली होती.

त्यानंतरधाराशिव नगर पालिकेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या कार्यकाळात झालेल्या बेकायदेशीर आणि चुकीच्या गुंठेवारी प्रकरणी संचिकेची पडताळणी करण्यासाठी दहा जणांना नियुक्त करण्यात आली आहे. त्यात ज्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे, त्यालाच नियुक्त करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत धाराशिव लाइव्हने दणका देताच, ठपका ठेवण्यात आलेल्या गोरोबा आवचार यांची या पडताळणी समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

या गुंठेवारी प्रकरणी चारही दोषी कर्मचाऱ्याविरुद्ध मुख्याधिकारी वसुधा फड या गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करावे, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

दरम्यान , पालिकेचे दोषी कर्मचारी लिपिक गोरोबा आवचार , स्थापत्य अभियंता दत्तात्रय कवडे हे प्रकरण मिटवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचे उंबरठे झिझवत आहेत, परंतु आ. सुरेश धस हे याप्रकरणी आक्रमक झाल्याने त्यांची कुठेही डाळ शिजली नाही.

 

 

 

Previous Post

आत्तापर्यंत कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठाच्या आढळल्या 1215 नोंदी

Next Post

धाराशिवमध्ये भेसळयुक्त 109 किलो साठा जप्त

Next Post
धाराशिवमध्ये भेसळयुक्त 109 किलो साठा जप्त

धाराशिवमध्ये भेसळयुक्त 109 किलो साठा जप्त

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल

जयंती मिरवणुकीत कर्णकर्कश ‘डीजे’चा दणदणाट; आयोजकांसह जालना, पुणे, सोलापूरच्या साऊंड मालकांवर ३ गुन्हे दाखल

April 17, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; सोनेगावमध्ये घरफोडी, तर अणदूर येथून दुचाकी लंपास

April 17, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जुन्या भांडणाच्या कुरापतीतून तुरोरीत बाप-लेकाला बेदम मारहाण; ५ जणांवर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

April 17, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

‘आमच्याबद्दल का सांगितले?’ या रागातून सास्तूरमध्ये संपूर्ण कुटुंबावर जीवघेणा हल्ला; अपंग बहिणीलाही मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

April 17, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याच्या कामात ६ लाखांच्या खंडणीसाठी महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; वाशी पोलिसांत चौघांवर गुन्हा

April 17, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group