• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘व्हीप’चा फास, अपात्रतेचा सस्पेन्स अन् बंगल्यावर बसलेल्या ‘गटनेत्या’चा खतरनाक गेम!

धाराशिव 'कुरुक्षेत्र' नवा अंक:  20

admin by admin
August 28, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिवच्या राजकारणात ‘ऑपरेशन लोटस’ फेल झाले आणि ओमराजेंचे ‘ऑपरेशन टायगर’ कसे सक्सेस झाले, याची चुरचुरीत स्टोरी आपण वाचलीच असेल. पण थांबा! हा पिक्चर इथंच संपलेला नाही, खरा ‘क्लायमॅक्स’ आणि कायदेशीर खेळ तर आता कुठं सुरू होणार आहे! चार नगरसेवक पळवून शिंदे गटाने तात्पुरती बाजी मारली असली, तरी आता या नगरसेवकांच्या डोक्यावर ‘अपात्रतेची (Disqualification) टांगती तलवार’ लटकू लागली आहे. आणि या सगळ्यात सर्वात मोठी कॉमेडी म्हणजे, ज्याच्या हातात ही तलवार आहे, तोच गायब आहे!

गणिताचा घोळ: ५ जण लागतात, पण गळाला लागले ४ च!

कायद्याच्या भाषेत सांगायचे तर, ‘पक्षांतर बंदी कायद्यानुसार’ (Anti-Defection Law) जर कारवाई टाळायची असेल, तर एकूण संख्येच्या दोन तृतीयांश (2/3) सदस्यांनी गट सोडणे आवश्यक असते. धाराशिव नगरपालिकेत ठाकरे गटाचे एकूण ७ नगरसेवक होते. यापैकी अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात गेलेत फक्त ४! म्हणजे कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांना अजून एका (५ व्या) नगरसेवकाची नितांत गरज आहे.

पण हा ५ वा नगरसेवक आहे कुठे? तर हा पठ्ठ्या अधिकृतपणे भाजपमध्ये गेला नसला, तरी तो सध्या थेट भाजप आमदार राणा पाटलांच्या बंगल्यावर चहापाणी घेत असल्याचं (आणि तिथूनच सूत्रे हलवत असल्याचं) दिसत आहे! शिंदे सेनेचा गळ लागलाय, पण पाचवा मासा मात्र भाजपच्या तंबूत जाऊन बसलाय.

ठाकरे गटाची कोंडी: ‘व्हीप’ वाजवणार कोण?

इकडे उद्धव ठाकरे गटाने (उबाठा) जाहीर करून टाकले आहे की, “शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या या ४ गद्दारांना आम्ही अपात्र ठरवण्यासाठी थेट कोर्टात जाणार!” पण इथंच खरी गोम आणि राजकारणाची सर्वात मोठी गंमत दडली आहे!

कोर्टात जाऊन नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी पक्षाचा अधिकृत ‘व्हीप’ (प्रतोद/गटनेता) काढावा लागतो. आणि पालिकेतील ठाकरे गटाच्या नगरसेवकांना व्हीप बजावण्याचा कायदेशीर अधिकार कोणाकडे आहे? तर तोच ५ वा नगरसेवक, जो सध्या साहेबांच्या (भाजपच्या) बंगल्यावर आश्रयाला गेला आहे!

म्हणजेच, ज्या ४ जणांवर कारवाई करायची आहे, त्यांच्यावर कारवाईचा आसूड ओढणारा ‘गटनेता’ चक्क ठाकरेंचा शत्रू असलेल्या भाजपच्या मांडीवर जाऊन बसला आहे! आता हा गटनेता नेमका कोणाचा आदेश पाळणार?

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र? नवा डाव शिजतोय!

आता राजकीय वर्तुळात भन्नाट तर्कवितर्क लढवले जात आहेत. काहींच्या मते, शिंदे सेनेत गेलेल्या या ४ जणांचा बदला घेण्यासाठी, भाजप म्हणजे भावी खासदार मल्हार पाटील आता एक डेंजरस ‘गेम’ करणार आहे.

साहेबांच्या ‘बंगल्यावर बसलेल्या’ ठाकरे गटाच्या गटनेत्याला  उबाठा पक्षातच ठेवून, त्याच्याकडून शिंदे गटात गेलेल्या ‘त्या’ ४ नगरसेवकांविरुद्ध ‘व्हीप’ वाजवण्यास सांगणार असल्याची दाट शक्यता आहे! म्हणजेच, साहेबांचे (राणा पाटलांचे) ‘ऑपरेशन लोटस’ फेल करणाऱ्या या ४ नगरसेवकांचा काटा काढण्यासाठी, भावी खासदार करामत करू शकतात, पण खासदार ओमराजे देखील कच्चा गुरुचे चेले नसल्याने ते यावेळी काय करतात, याकडे लक्ष वेधले आहे

पुढे काय? पिक्चर अभी बाकी है!

थोडक्यात सांगायचे तर, धाराशिव पालिकेचा हा तिढा आता एवढा गुंतागुंतीचा झालाय की, भल्याभल्या घटनातज्ज्ञांनाही यातून मार्ग काढताना घाम फुटेल!

  • शिंदे गट ५ वा नगरसेवक फोडून स्वतःला वाचवणार?

  • की साहेबांच्या बंगल्यावर बसलेला गटनेता भावी खासदारांच्या इशाऱ्यावर व्हीप काढून या ४ जणांचा बळी घेणार?

  • की या सगळ्या राजकारणात ठाकरे गट आपला वेगळाच डाव साधणार?

आगामी काळात कोर्टात आणि पालिकेत अशा काही नाट्यपूर्ण आणि थरारक घडामोडी घडणार आहेत, ज्याने धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप येईल. त्यामुळे डोळ्यांत तेल घालून पाहत राहा, कारण इथं कधीही, काहीही होऊ शकतं!

Previous Post

‘दाढीवाल्या बोक्या’चा डबल गेम! इकडे ‘डिफेंडर’ची वाट, तिकडे ठाण्यात ५० लाखांचा घाट अन् मल्हार दादांच्या शिव्या!

Next Post

परंडा : विवाहितेचे तोंड दाबून खांबाला बांधले; सुरीचा धाक दाखवून २.८४ लाखांचे दागिने लुटले, आंबी पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

परंडा : विवाहितेचे तोंड दाबून खांबाला बांधले; सुरीचा धाक दाखवून २.८४ लाखांचे दागिने लुटले, आंबी पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापूर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून शेतीसाठी पाणीचोरी; अणदूरच्या महिलेविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

तुळजापूर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून शेतीसाठी पाणीचोरी; अणदूरच्या महिलेविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

October 21, 2026
धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026

Recent Posts

  • तुळजापूर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून शेतीसाठी पाणीचोरी; अणदूरच्या महिलेविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!