• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘दाढीवाल्या बोक्या’चा डबल गेम! इकडे ‘डिफेंडर’ची वाट, तिकडे ठाण्यात ५० लाखांचा घाट अन् मल्हार दादांच्या शिव्या!

धाराशिव 'कुरुक्षेत्र' नवा अंक: 19

admin by admin
August 28, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
‘दाढीवाल्या बोक्या’चा डबल गेम! इकडे ‘डिफेंडर’ची वाट, तिकडे ठाण्यात ५० लाखांचा घाट अन् मल्हार दादांच्या शिव्या!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिवच्या राजकीय कट्ट्यांवर सध्या एकाच विषयाची ‘रसभरीत’ चर्चा चवीने चघळली जात आहे. विषय आहे साहेबांचे (आमदार राणा पाटील) आणि भावी खासदारांचे (मल्हार पाटील) ‘ऑपरेशन लोटस २.०’ कसे फेल झाले? आणि एका ‘दाढीवाल्या बोक्याने’ मल्हार दादांना कसा चुना लावला? राजकारणात निष्ठेचा बाजार कसा मांडला जातो, याची ही ‘ब्लॉकबस्टर’ स्टोरी भल्याभल्यांना चक्रावून टाकणारी आहे.

कळंबचा ‘रेट’ फुटला अन् धाराशिवच्या बोक्यांना हवा सुटली!

सगळ्या राड्याची सुरुवात झाली कळंबवरून! कळंब नगरपालिकेचे १० नगरसेवक भाजपमध्ये गेले. त्यांना प्रत्येकी ५० लाख आणि मुख्य सूत्रधाराला तब्बल १ कोटी मिळाल्याची ‘हवा’ वाऱ्यासारखी धाराशिवमध्ये पोहोचली. ही बातमी ऐकताच धाराशिवमधल्या ५ ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटले!

कालपर्यंत जे नगरसेवक राणा पाटील आणि मल्हार दादांच्या नावाने बोटे मोडत होते, रस्त्यावर उतरून शिव्या घालत होते आणि आंदोलने करत होते, तेच नगरसेवक केवळ ५० लाखांच्या ‘खोक्यांसाठी’ शेपूट घालून रातोरात पक्ष बदलायला तयार झाले!

‘भाव काय देणार?’: मल्हार दादा अन् दाढीवाल्याची बार्गेनिंग

यात सगळ्यात आघाडीवर होता तो आपला ‘दाढीवाला बोका’! या पठ्ठ्याने थेट ‘भावी खासदार’ मल्हार दादांना गाठले आणि ऑफर दिली- “आम्ही यायला तयार आहोत! माझ्यासोबत आणखी ३ जण आहेत, पाचवा तुम्हीच शोधा. पण बोला… आमचा भाव काय?”

मल्हार दादाही पक्के व्यापारी! ते ताठ मानेने म्हणाले, “आमचे आधीच २२ नगरसेवक आणि नगराध्यक्ष खिशात आहेत. तुमची तशी गरज नाही, पण आलाच तर जास्तीत जास्त १० लाख देऊ!” दाढीवाल्याने जीव तोडून बार्गेनिंग केली. शेवटी सौदा ठरला- बाकीच्यांना प्रत्येकी २५ लाख आणि ‘दाढीवाल्या बोक्याला’ ५० लाख!

इंदापूरचा राडा अन् ठाण्याचा मुक्काम

सौदा ठरल्यावर हे चार जण मुंबईकडे निघाले. पण वाटेत इंदापूरला एका हॉटेलमध्ये जेवायला (की ‘खोके’ वाटायला?) थांबल्यावर या नगरसेवकांमध्येच भयंकर हमरीतुमरी झाली. राडा एवढा वाढला की चार जण तडक धाराशिवला परतले. (पाचवा मात्र मल्हार दादांनी आपल्या बंगल्यावरच ‘सेफ’ ठेवला होता).

धाराशिवला परतलेल्या या चार जणांना लगेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ‘कॅच’ केले आणि थेट ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर नेऊन बसवले. ज्या ओमराजेंनी यांना निवडून आणण्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च केले, जीवाचे रान केले, त्याच ओमराजेंसोबत या दाढीवाल्या बोक्याने पुन्हा ‘बार्गेनिंग’ सुरू केली! शेवटी ओमराजेंच्या मामाने मध्यस्थी केली आणि तिथेही ५० लाखांवर सौदा ‘लॉक’ झाला!

फेसबुकची पोस्ट अन् ‘डिफेंडर’ गाडीचा सस्पेन्स!

इकडे हे ठाण्यात बसलेले असताना, धाराशिवमध्ये दाढीवाल्याच्याच जुन्या वैऱ्याने (जो आता भाजपचा स्वीकृत नगरसेवक आहे) फेसबुकवर बॉम्ब टाकला— “दाढीवाला बोका १ कोटीला विकला!”

ही पोस्ट वाचताच ठाण्यात बसलेला बोका बिथरला. त्याने ठाण्याच्या बंगल्यातून लपून थेट मल्हार दादांना फोन लावला! “दादा, मी तुमच्याकडेच येतो, पण त्या नगरसेवकाला सांगून ती बदनामीची पोस्ट आधी डिलीट करायला सांगा!” दादांनी सूत्रे हलवली, पोस्ट डिलीट झाली.

पोस्ट डिलीट होताच या बोक्याने ठाण्यातल्या बाकी ३ नगरसेवकांना उचकावायला सुरुवात केली. “अरे चला पळूया, तिकडे भाजपमध्ये १ कोटी मिळतायत!” इकडे शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांची घालमेल आणि तिकडे मल्हार दादांची अवस्था… या एका बोक्याने दोन्हीकडची हवा ‘टाईट’ करून टाकली होती!

सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे, या दाढीवाल्याने ठाण्यातल्या उप मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरून मल्हार दादांना मेसेज करून पळून जाण्यासाठी गाडी पाठवायला सांगितली! दादांनीही तत्काळ आपली आलिशान ‘डिफेंडर’ (Defender) गाडी बंगल्याजवळ उभी केली. पण शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तिथे असा काही कडक पहारा लावला होता, की या बोक्याला डिफेंडरपर्यंत पोहोचताच आले नाही!

गमछा पडला अन् मल्हार दादांच्या ‘शिव्या’ सुरू!

शेवटी एकदाचे एकनाथ शिंदे आले, त्यांनी या चारही जणांच्या गळ्यात शिवसेनेचा ‘गमछा’ घातला आणि पक्षप्रवेशाचा सोहळा उरकला. इकडे ‘शिंदे सेनेत’ स्वागत आणि तिकडे ‘ठाकरे सेना’ आणि ‘भाजप’ कडून ‘गद्दार’ अशा पोस्टचा पाऊस सुरू झाला.

दाढीवाला बोका शिंदे सेनेत गेल्याची बातमी मल्हार दादांना समजताच दादांचा पारा सातव्या आस्मानावर गेला. त्यांनी थेट दाढीवाल्याला फोन लावला आणि अशा काही ‘शिव्या’ हासडल्या की विचारू नका! “तू माझ्या बंगल्यावर भीक मागायला आला होतास! मी नाही आलो तुझ्याकडं…” अशा शब्दांत दादांनी त्याचा पार उद्धार केला.

१ कोटीचा गद्दार: बोक्याची ना घर का ना घाट का अवस्था!

या सगळ्या नाटकानंतर, ज्या भाजप नगरसेवकाने फेसबुक पोस्ट डिलीट केली होती, त्याने रातोरात संपूर्ण धाराशिव शहरात मोठे होर्डिंग्ज लावले! त्यावर ठळक अक्षरात लिहिले होते— “१ कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही! १ खोका, मतदाराला दिला धोका… आमचं मत आम्हाला परत द्या!”

शेवटी काय झाले? पैशांसाठी एका क्षणात स्वतःची निष्ठा विकणारा हा ‘दाढीवाला बोका’ शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप अशा तिन्ही पक्षांत कायमचा ‘बदनाम’ झाला! ५० लाखांच्या लालसेपायी त्याने स्वतःची राजकीय अब्रू वेशीवर टांगली आणि जनतेच्या नजरेतून तो कायमचा उतरला!

Previous Post

पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्ह्याचा निषेध; आमदार कैलास पाटलांचा सरकारवर निशाणा

Next Post

‘व्हीप’चा फास, अपात्रतेचा सस्पेन्स अन् बंगल्यावर बसलेल्या ‘गटनेत्या’चा खतरनाक गेम!

Next Post
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

'व्हीप'चा फास, अपात्रतेचा सस्पेन्स अन् बंगल्यावर बसलेल्या 'गटनेत्या'चा खतरनाक गेम!

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!