वाशी : दि.28.05.2024 रोजी 00.00 ते 03.00 वा. सु. सारोळा मा. शिवारातील एस ए आर-04 या पॉईट पवनचक्की कॉपर वायर अंदाजे 80,000 ₹ किंमतीचा अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अंगद विश्वनाथ भैरट, वय 33 वर्षे, रा. शेलगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.11.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-विक्रम शिवाजी चव्हाण, वय 31 वर्षे, आलीयाबाद तांडा जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची 30,000₹ किंमतीची टिव्हीएस व्हिकटर मोटरसायकल क्र एमएच 25 एएम 4177 ही दि. 09.06.2024 रोजी 14.00 ते 15.00 वा. सु. सगर मेडकल चिंचेच्या झाडाखाली जळकोट येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विक्रम चव्हाण यांनी दि.11.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-दयानंद पांडुरंग चव्हाण, वय 45 वर्षे, रा. राजे शिवाजीनगर लातुर ह.मु. कृष्णानगर बार्शी रोड धाराशिव शहर यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल क्र एमएच 24 एएल 9698 ही दि.06.06.2024 रोजी 00.30 ते 05.00 वा. सु. कृष्णानगर बार्शी रोड धाराशिव शहर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दयानंद चव्हाण यांनी दि.11.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे- शुभम राजाभाउ भोसले, वय 30 वर्षे, रा. कोंड ता. जि. धाराशिव यांचे कोंड शिवारातील शेत गट नं 78/4 मधील विहीरीवरील पानबुडी मोटार अंदाजे 10,000₹ किंमतीची व महादेव विश्वास लाकाळ रा. पळसप यांचे पिकअप चे सहा टायर असा एकुण 25,000₹ किंमतीचा माल हा दि. 09.06.2024 रोजी 18.00 ते दि. 10.06.2024 रोजी 07.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शुभम भोसले यांनी दि.11.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
धाराशिव : फिर्यादी नामे-आण्णासाहेब बाबासाहेब शेलार, वय 45 वर्षे, रा. पळसवाडी ता. जि. धाराशिव ह.मु.जुनी गल्ली धाराशिव यांना पळसवाडी व धाराशिव येथे असताना मोबाईल धारक 8827149240 दिया यांनी स्वत: ची ओळख लपवून फिर्यादी यांना बोगस मार्केट ॲप घेण्यास लावून दि. 15.04.2024 रोजी 17.00 ते दि. 18.05.2024 रोजी 18.30 वा. सु. नउ वेळा पैसे भरण्यास लावून फिर्यादी व फिर्यादीचे पत्नी यांचे बॅक खाते वरुन वेगवेगळ्या बॅक एस बी आय खाते क्र 00000042907213882 चा धारक, एसबीआय बॅक खाते क्र 42898948700 चा धारक, एसबीआय बॅक खाते 41872826563 चा धारक, महाराष्ट्र बॅक खाते 60484206413 खात्यावर पैसे भरण्यास सांगुन ज्यादा पैशाचे अमिष दाखवून 13,06,000₹ ऑनलाईन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आण्णासाहेब शेलार यांनी दि. 11.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 420 सह 66 सी, 66 डी माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे