• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 15, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

खुशखबर ! वगळलेल्या १७ मंडळांना २५ टक्के अग्रीम मंजूर

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न - कृषी अधिकारी

admin by admin
November 7, 2023
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
खुशखबर ! वगळलेल्या १७ मंडळांना २५ टक्के अग्रीम मंजूर
0
SHARES
583
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील ५७ पैकी १७ मंडळांना अग्रीममधून वगळण्यात आले होते. याबाबत संतापाची लाट उसळली होती. याबाबत धाराशिव लाइव्हने आवाज उठवताच, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील यांनी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, वगळलेल्या १७ मंडळांना देखील खरीप पीक विम्याचा २५ टक्के अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. हा अग्रीम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी सांगितले.

‘दुष्काळ’ हा धाराशिव जिल्ह्याच्या पाचवीला पुजला आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. पिण्याची पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे. जिल्ह्यात मोठा 1, मध्यम 17, लघु 208, असे एकूण 226 प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील 226 प्रकल्पांची 726.962 दलघमी पाणी साठविण्याची क्षमता आहे. मात्र, जुलैअखेरीस एकूण प्रकल्पात फक्त 53.2468 दलघमी पाणी असून, त्याची टक्केवारी 7.32 इतकी आहे. जिल्ह्यातील 34 प्रकल्प अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत.

जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना, धाराशिव , लोहारा आणि वाशी हे तीनच तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तर तुळजापूर, उमरगा, भूम, परंडा, कळंब तालुक्यावर अन्याय करण्यात आला आहे , त्याचबरोबर जिल्ह्यातील ५७ पैकी ४० मंडळांना खरीप पीक विमा चा अग्रीम वाटप करण्यात आला होता तर तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकुर, मोहा, गोविंदपूर, भूम तालुक्यातील भूम,वालवड, अंभी, पाथरुड, माणकेश्वर, आष्टा, परांडा तालुक्यातील आसू, जवळा, पाचपिंपळा, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा व उमरगा तालुक्यातील नारंगवाडी या १७ मंडळावर अन्याय करण्यात आला होता. या मंडळांनी घोडे मारले का ? असा प्रश्न धाराशिव लाइव्हने विचारला होता.

सर्वच ५७ मंडळांना मिळणार पीक विम्याचे अग्रीम

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्हयातील ७ लाख ५७ हजार ८५३ अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविलेला होता. त्यापैकी ५ लक्ष ६० हजार ४६८ शेतकऱ्यांनी ५ लक्ष २३ हजार ४०६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबिन पीक संरक्षित केले होते. योजनेच्या तरतुदीनुसार हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थिती उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित पिकांचे शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत ७ वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येते.

त्याअनुषंगाने हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे. या बाबीअंतर्गत प्रातिनिधीक सूचकांच्या आधारे जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळापैकी धाराशिव तालुक्यातील धाराशिव शहर, धाराशिव ग्रामीण, अंबेजवळगे, येडशी, ढोकी, जागजी, तेर, बेंबळी, केशेगाव, पाडोळी, करजखेडा, तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर, मंगरुळ, ईटकळ, तामलवाडी, सावरगाव, जळकोट, सलगरा, आरळी बु., उमरगा तालुक्यातील उमरगा, डाळींब, मुळज, मुरुम, बेडगा, बलसुर, लोहारा तालुक्यातील लोहारा, जवेळी, धानुरी, माकणी, कळंब तालुक्यातील शिराढोण, नायगाव, येरमाळा, मस्सा खु., वाशी तालुक्यातील पारगाव, पारा, भूम तालुक्यातील ईट तर परंडा तालुक्यातील परंडा, सोनारी, शेळगाव, अनाळा अशा ४० महसूल मंडळात सलग २१ दिवस पावसात खंड पडल्यामुळे आणि त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकूर, मोहा, गोविंदपूर, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा, भूम तालुक्यातील अंभी, पाथ्रुड, माणकेश्वर, आष्टा, भूम, वालवड तर परंडा तालुक्यातील आसु, जवळा व पाचपिंपळा अशा उर्वरीत १७ महसूल मंडळात कमी पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पावसातील विचलन आदी बाबींचा विचार करुन सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मिळण्याकरिता अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती. परंतु उर्वरीत १७ महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याच्या बाबतीत विमा कंपनीने काहीं हरकती नोंदविल्या होत्या.

सदर प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी २१ ऑगस्ट, १२ सप्टेंबर व ६ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन विमा कंपनीस अग्रीम देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच हरकतीच्या मुद्यांच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत सविस्तर खुलासा २५ सप्टेंबर २०२३ रोजी पाठवून विमा कंपनीस पाठवून उर्वरीत १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील २५ टक्के आगाऊ रक्कम वितरीत करण्याकरीता विमा कंपनीस आदेशित केले होते. ६ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये आयुक्त (कृषि), यांना देखील ४० महसूल मंडळातील शेतकऱ्याबरोबरच उर्वरीत १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील अग्रीम रक्कम देण्याकरीता आयुक्त (कृषी) यांच्या स्तरावरुन विमा कंपनीस आदेशीत करण्याबाबत कळविले होते. तसेच मुख्यमंत्री यांच्या ४ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये विमा कंपनीस दिलेल्या निर्देशानुसार व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे ३० ऑक्टोबर २०२३ रोजी विमा कंपनीस जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळातील सर्व सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम दिवाळीपुर्वीच जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कळविले होते.

त्यास एचडीएफसी इर्गों या विमा कंपनीने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे जिल्ह्यातील ४० महसूल मंडळातील सोयाबीन विमाधारक शेतकऱ्याबरोबरच उर्वरीत १७ महसूल मंडळातील सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांना देखील अग्रीम विमा रक्कम मंजूर करण्यात आला आहे. ४० महसूल मंडळातील ३ लाख ४४ हजार ८३५ शेतकऱ्यांना १६१ कोटी ८० लक्ष रक्कमेच्या वितरणाची कार्यवाही चालू आहे.तर उर्वरित १७ महसुल मंडळातील शेतकऱ्यांना देखील दिवाळीपुर्वीच अग्रीम विमा रक्कम वितरीत होणार आहे.असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी कळविले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील १७ मंडळांनी घोडे मारले का ?

या बातमीची आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील दखल घेतली. त्यांनी शासन दरबारी आवाज उठवला, त्यामुळे अखेर वगळलेल्या १७ मंडळांना देखील खरीप पीक विम्याचा २५ टक्के अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.

धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत जास्त घट आल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळांत २५ % पीकविमा अग्रीम रक्कम मंजूर करावा, यासाठी सततचा पाठपुरावा सुरू होता. जिल्हात मोठे नुकसान होऊनही यापूर्वी ४० मंडळातील शेतकरी पात्र झाले होते. परंतु उर्वरित १७ मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीमच्या मदतीपासून वंचित ठेवण्याचा डाव विमा कंपनीने मांडला होता. याबाबत आपण मुख्यमंत्री महोदयांना निवेदनाद्वारे अवगत केले होते.

आपण केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, वगळलेल्या उर्वरित १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यासंबंधी आज जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी अधिसूचना काढली आहे. या कठीण काळात हा १७ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे..

-आ. कैलास पाटील

Previous Post

धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन लेखापालाची मुजोरी

Next Post

सणासुदीत धाराशिव शहर काळोखात

Next Post
सणासुदीत धाराशिव शहर काळोखात

सणासुदीत धाराशिव शहर काळोखात

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

चारित्र्याच्या संशयातून खून: उमरगा पोलिसांनी प्रियकराला २४ तासांत पुण्यामधून ठोकल्या बेड्या

July 15, 2025
परंडा येथील सराफ व्यावसायिक लूट प्रकरण: स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघे गजाआड, सुमारे २ लाखांचा मुद्देमाल जप्त

परंडा येथील सराफ व्यावसायिक लूट प्रकरण: स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघे गजाआड, सुमारे २ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 15, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; दोन मोटारसायकली आणि पानबुडी लंपास

July 15, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तामलवाडी : हायवेवर धोकादायकरित्या रिक्षा उभी केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

July 15, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंड्यात गोवंश मांसाची अवैध वाहतूक उघड, बोलेरो गाडीसह ५०० किलो मांस जप्त

July 15, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group