• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 30, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

४ गावठी पिस्टल आणि ३ जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई

admin by admin
June 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
४ गावठी पिस्टल आणि ३ जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद
0
SHARES
896
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात धाराशिव पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने बेंबळी ते धाराशिव रोडवरील साळुंखे नगर कमानीजवळ सापळा रचून दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ४ गावठी पिस्टल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम मोटरसायकलवरून गावठी पिस्टल घेऊन धाराशिवहून बेंबळीकडे जात आहेत.

माहिती मिळताच पथकाने पंचांना पाचारण केले आणि साळुंखे नगर कमानीजवळ दबा धरून बसले. रात्री अंदाजे ११:०० वाजण्याच्या सुमारास संशयित मोटरसायकल येताना दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवले.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१) बालाजी बबन काळे (रा. कल्याणनगर भुम, सध्या मुक्काम गोलेगाव पारधी पिडी, ता. भुम, जि. धाराशिव) २) आश्रु उर्फ भुऱ्या भिमा काळे (वय ३० वर्षे, रा. जांब, ता. भुम, जि. धाराशिव)

पंचांसमक्ष या आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे ४ लोखंडी गावठी पिस्टल (काळ्या रंगाची ग्रीप असलेले) आणि ३ जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी शस्त्रे आणि मोटरसायकल (क्र. MH 25 AU 9433) यांसह एकूण २,९४,५००/- रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे.

पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना धाराशिव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक  विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) अमोल मोरे, पोलीस अंमलदार समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, महिला पोलीस अंमलदार शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे, चालक पोलीस अंमलदार दहीहांडे, शेरखाने आणि पोलीस अंमलदार मुंगळे यांच्या पथकाने यशस्वीरी्या पार पाडली.

Previous Post

मुरुम पोलिसांची मोठी कारवाई! अचलेर तांड्यात विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्याला रंगेहात पकडले; गावठी कट्टा जप्त

Next Post

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे क्षुल्लक कारणावरून तरुणाला सत्तूरने बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल!

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे क्षुल्लक कारणावरून तरुणाला सत्तूरने बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल!

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजाभवानी मंदिरात दर्शनादरम्यान महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे दागिने लंपास

July 30, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

रामलिंग मंदिर परिसरात भाविकाला लुटले; मोबाईल व रोख रक्कम हिसकावली, चौघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

July 30, 2026
भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना नगरसेवकांपासून जीविताला धोका

भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना नगरसेवकांपासून जीविताला धोका

July 30, 2026
धाराशिव भाजप भवनावरून कायदेतज्ज्ञांत रंगला ‘कलगीतुरा’!

धाराशिव भाजप भवनावरून कायदेतज्ज्ञांत रंगला ‘कलगीतुरा’!

July 29, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!