वाशी : फिर्यादी नामे-रशीद जुहुर खान, वय 39 वर्षे, रा. खेउला पुनाहाना ता. पुनहाना जि. नु मेवात हरियाना हे आयशार क्र एमएच 04 जी आर 4202 मध्ये आंध्रप्रदेश ते जयपूर येथे अडानी कंपीची फॉर्च्युन ऑइलचे 55 बॉक्स अंदाजे 63,360 ₹ किंमतीचे हे दि. 15.12.2023 रोजी 20.30 ते 21.30 वा. सु. वाशी फाटा येथे रविराज हॉटेल जवळून अनोळखी दोन व्यक्ती हे मोटरसायकल क्र एमएच 13 बीपी 9485 वरुन चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रशीद खान यांनी दि.17.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-आशिफ आयुब बागवान, वय 29 वर्षे, रा. मुन्शी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची हिरो फॅशन प्रो क्र एमएच 14 ईके 7861 ही दि. 17.12.2023 रोजी 10.00 वा. सु. जकेकुर शिवारातील युवराज समाने यांचे शेतातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आशिफ बागवान यांनी दि.17.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.