धाराशिव: धाराशिव जिल्हा पोलीस दलातील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या (सपोनि आणि पोउपनि) जिल्ह्यांतर्गत बदल्या व पदस्थापनेचे आदेश पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दिनांक १ जुलै २०२६ रोजी काढले आहेत. प्रशासकीय तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या १ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला.
या बदल्यांमध्ये खालील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे:
-
सपोनि धरणीधर बाबा कोळेकर: यांची शिराढोण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदावरून भूम उपविभागीय पोलीस अधिकारी (उपविपोअ) यांचे वाचक म्हणून बदली करण्यात आली आहे.
-
सपोनि राम सुखदेव घाडगे: यांची कळंब पोलीस ठाण्यातून शिराढोण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
-
सपोनि समाधान गोपीनाथ बजबळकर: यांची धाराशिव पोलीस नियंत्रण कक्षातून कळंब पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
-
पोउपनि किरण अर्जुन शिंदे: यांची धाराशिवच्या पिंक पथकातून धाराशिव पोलीस नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.
-
पोउपनि सुकुमार गणपत बनसोडे: यांची धाराशिव पोलीस नियंत्रण कक्षातून पिंक पथकात नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी या पोलीस अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी हजर होण्यासाठी तत्काळ व बिनचूक कार्यमुक्त करावे आणि तसा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.





