धाराशिव – नीती आयोगाने जाहीर केलेल्या मागास जिल्ह्याच्या यादीत धाराशिवचा तिसरा नंबर लागला होता. त्यामुळे या जिल्ह्याची नाचकी झाली होती. मात्र याच धाराशिव शहरातील रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार आहे. अमृत भारत योजनेत समावेश असलेल्या धाराशिव रेल्वे स्थानकासाठी पहिल्या टप्प्यातील सात कोटींचे काम अंतिम टप्प्यात आहे.
धाराशिव रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणात जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे दर्शन घडणार आहे.ऐतिहासिक लूक असलेल्या भिंती, त्यावर तुळजाभवानी मातेसह इतर धार्मिक वारशाची माहिती देण्यात आली आहे. गड किल्ल्यांच्या भिंतीप्रमाणे देखण्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. धाराशिव रेल्वेस्थानक आता कात टाकत आहे. सध्या रेल्वेस्थानकात विविध धाराशिव येथील रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे सुरू आहे.
सर्व सुविधायुक्त प्रतीक्षा कक्ष
धाराशिव रेल्वे स्थानकावर प्रवाशांकरिता सर्व सुविधायुक्त प्रवासी प्रतीक्षालय उभारण्यात येत आहे. सामान्य प्रवाशांसाठीअसलेल्या प्रतीक्षा घराचे रंगरंगोटी व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी असलेल्या प्रतीक्षालयात चार्जिंगसह, विसावा, सर्व सुविधांसह आसन व्यवस्था नव्याने लावण्यात येत आहे. रेल्वे स्थानकाच्या जुन्या शौचालयाला तोडून अत्याधुनिक सुविधा असणारे आधुनिक पद्धतीचेशौचालय इमारत नव्याने तयार येत आहेत.
रेल्वे स्टेशनवर होताहेत नव्याने खालील सुविधा
प्रतीक्षालय शौचालय सुविधा, एक्सलेटर बसवणे, स्थानिक उत्पादन विक्रीसाठी स्टॉल, वायफाय सुविधा, धाराशिव स्टेशनच्याआवश्यकतेनुसार इतर आणखी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.दिव्यांग व्यक्तींनाही विशेष सुविधा मिळणार आहेत.
संपूर्ण रेल्वेस्थानक आणणार एकाच छताखाली
धाराशिव रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा या नव्या योजनेंतर्गत बदलणार आहे. प्रवाशांसाठी सर्व सुविधा होत असून सर्व रेल्वे स्थानक एकाछताखाली आणले जाणार आहे.-दीपक कुमार, सिनियर सेक्शन इंजिनियर, सोलापूर.