धाराशिव शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे. चार-चार वर्षे मंजुरी मिळूनही कामे होत नाहीत, आणि झाली तरी निकृष्ट दर्जाची असतात. नागरिकांना फक्त धूळ आणि खड्डेच वाट्याला येत आहेत. सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेना (ठाकरे गट) यांच्या कार्यकर्त्यांनीच ठेकेदार बनून ही कामे लाटली आहेत, त्यामुळे कोणीच कुणावर बोलत नाही!
धाराशिव Live च्या बातमीनंतर काम सुरू, पण अजूनही अपूर्ण!
धाराशिव Live च्या बातमीनंतर समतानगरमधील विसर्जन विहीर ते सुधीर पाटील यांच्या घरापर्यंतचा रस्ता सुरू झाला, पण अजून एक लेयर बाकीच आहे!
🚨 विशेष म्हणजे, विसर्जन विहीर परिसरातील रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार होता, त्याला चार वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली.
➡️ हा ठेका आधी राष्ट्रवादीतील आणि आता भाजपमध्ये असलेल्या माजी नगरसेवकाने घेतला.
➡️ काम सुरू न करताच या नगरसेवकाने अॅडव्हान्स घेतला, पण प्रत्यक्षात काम सुरूच नाही!
भाजप-शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांची ठेकेदारी – लूटमारचा ‘बायोपिक’!
👉 भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते कंत्राटदार झाले असून, कामे मिळवण्यासाठी टक्केवारीचे व्यवहार सर्रास सुरू आहेत.
👉 कामे दुसऱ्याच्या नावावर घेऊन त्यात मोठ्या प्रमाणावर दलाली खेळली जाते.
👉 जर कामे झालीच, तर ती निकृष्ट असतात. साहेब आणि मॅडमला टक्केवारी दिली की बिलं सहज मंजूर होतात!
👉 काही कंत्राटदार मॅडमची सही मिळवण्यासाठी थेट लातूरपर्यंत जातात!
👉 जेव्हा या मंडळींना काम मिळत नाही, तेव्हा अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून दबाव टाकला जातो.
‘तेरी भी चूप, मेरी भी चूप!’ – सत्ताधारी आणि विरोधक दोघेही गप्प!
धाराशिवच्या नागरिकांसाठी रस्ते हा जळजळीत प्रश्न आहे, पण भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनीच ठेकेदारी लाटल्याने कोणीच एकमेकांविरुद्ध बोलत नाही!
👉 काम निकृष्ट झालं तरी दोन्ही गट गप्प!
👉 रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली तरी कुणी आवाज उठवत नाही!
👉 त्यामुळेच “तेरी भी चूप, मेरी भी चूप” हे ठेकेदारीचं गुप्त समीकरण सुरू आहे.
चार वर्षांतही 73 लाखांचा रस्ता पूर्ण नाही – भ्रष्टाचाराचा कळस!
🚨 छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्ता करण्यासाठी 73 लाख 93 हजार रुपये मंजूर झाले, तरी काम अपूर्णच!
🚨 महात्मा फुले चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचा रस्ता एका जोडगोळीने घेतला आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले!
🚨 छत्रपती संभाजी महाराज चौक ते आनंद बाजार रस्त्याचीही हीच अवस्था!
नगरपालिका आणि कंत्राटदार यांची ‘सांठगांठ’!
➡️ आनंद बाजार ते महात्मा फुले चौक रस्ता रखडला, पण कंत्राटदारावर कारवाई नाही!
➡️ नगरपालिका अभियंता आणि कंत्राटदारांची मिलीभगत असल्यामुळे नागरिकांच्या पैशांची सर्रास उधळपट्टी सुरू आहे.
➡️ रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्याची नागरिकांची मागणी आहे.
धाराशिवकरांनी आता आवाज उठवायला हवा!
धाराशिव शहराला रोजच या निकृष्ट रस्त्यांचा फटका बसतोय. आता फक्त तक्रारी करून उपयोग नाही, तर जबाबदारांवर थेट कारवाईची मागणी नागरिकांनी करायला हवी!
📢 “कोणी तरी काहीतरी करेल” या मानसिकतेतून बाहेर पडा आणि तुमच्या हक्काच्या सुविधा मिळवण्यासाठी तुम्हीच लढा!” 🚨