• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

४० वर्षांचा रस्ता अचानक जि.प.चा कसा झाला? अध्यक्षांच्या मनमानीला ठाकरे गटाचा दणका, समतानगरचा रस्ता पुन्हा मोकळा!

admin by admin
April 24, 2026
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
४० वर्षांचा रस्ता अचानक जि.प.चा कसा झाला? अध्यक्षांच्या मनमानीला ठाकरे गटाचा दणका, समतानगरचा रस्ता पुन्हा मोकळा!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव पंचायत समिती गेट ते समतानगरकडे जाणारा ४० वर्षांचा जुना आणि वहिवाटीचा रस्ता बंद करण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा मनमानी डाव आज पुन्हा एकदा उधळून लावण्यात आला आहे. जि.प. अध्यक्षांच्या केवळ तोंडी सांगण्यावरून पहाटेच्या अंधारात रस्त्यावर रोवलेले सिमेंटचे पोल आणि काटेरी कुंपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उखडून फेकत हा रस्ता जनतेसाठी पुन्हा मोकळा केला आहे.

गेली ४० वर्षे हा रस्ता सर्वसामान्यांच्या वहिवाटीत आहे. कोर्ट, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठी नागरिकांसाठी हा सर्वात सोयीचा आणि जवळचा (शॉर्टकट) रस्ता आहे. असे असताना, अचानक हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असल्याचा ‘साक्षात्कार’ जि.प. अध्यक्षा अर्चना पाटील यांना कसा झाला? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. केवळ त्यांच्या तोंडी आदेशाचा आधार घेत प्रशासनाने हा रस्ता बंद करण्याची दडपशाही सुरू केली आहे.

१ कोटींचा निधी गेला कुठे?

विशेष संतापजनक बाब म्हणजे, शहरातील रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या १४० कोटी रुपयांच्या निधीतून याच रस्त्याच्या कामासाठी १ कोटी रुपये खर्च केले जाणार होते. शहरात इतरत्र रस्त्यांची कामे वेगात सुरू असताना, या रस्त्याच्या बाबतीत नेमकी ‘माशी कुठे शिंकली?’ हे मात्र गुलदस्त्यात आहे. मंजूर झालेला निधी अचानक का थांबवला गेला आणि रस्ता करण्याऐवजी तो बंद का केला जात आहे, याचे उत्तर द्यायला कोणीही तयार नाही.

प्रशासनाचा निर्लज्जपणा; १५ दिवसांत दुसरा प्रयत्न

प्रशासनाने हा रस्ता अडवण्याचा केलेला हा पहिला प्रयत्न नाही. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीही याच पद्धतीने काटेरी कुंपण घालून रस्ता बंद करण्यात आला होता. त्यावेळी संतप्त नागरिकांनी स्वतः रस्त्यावर उतरून ते कुंपण मोडून काढले होते. तरीही प्रशासनाने यातून कोणताही धडा न घेता पुन्हा तीच चूक केली.

हा रस्ता वारंवार का बंद केला जात आहे? यामागे नेमके कोणाचे छुपे हितसंबंध दडले आहेत? सर्वसामान्यांची अडवणूक करून प्रशासनाला काय साध्य करायचे आहे? या प्रश्नांची उत्तरे ना प्रशासनाकडे आहेत, ना पदाधिकाऱ्यांकडे. मात्र ठाकरे गटाने दिलेल्या या सडेतोड उत्तरानंतर तरी प्रशासनाची झोप उघडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Previous Post

तुळजाभवानी मंदिरात नियमांचे उल्लंघन: पुजाऱ्यावर ५ वर्षे प्रवेशबंदी, सुरक्षा कंपनीला एक लाखाचा दंड

Next Post

१० लाखांच्या खंडणीसाठी कापला १३२ केव्हीचा वीज टॉवर; १ कोटी २० लाखांचे नुकसान, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

१० लाखांच्या खंडणीसाठी कापला १३२ केव्हीचा वीज टॉवर; १ कोटी २० लाखांचे नुकसान, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!