• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

१० लाखांच्या खंडणीसाठी कापला १३२ केव्हीचा वीज टॉवर; १ कोटी २० लाखांचे नुकसान, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
April 24, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : दहा लाख रुपयांची खंडणी न दिल्यास वीज टॉवर पाडण्याची धमकी देऊन, चक्क चालू लाईनवरील १३२ केव्ही क्षमतेच्या टॉवरचे खांब गॅस कटरने कापल्याचा धक्कादायक प्रकार तुळजापूर तालुक्यातील मुर्टा शिवारात उघडकीस आला आहे. यात ‘टाटा पॉवर’ कंपनीचे तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले असून, लोकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुर्टा (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील शेत गट क्र. २९७/२ मध्ये ‘टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लि.’ कंपनीच्या वतीने १३२ केव्ही क्षमतेचा वीज वाहक टॉवर (क्र. २१) उभारण्यात आला आहे. हे शेत आरोपी निखिल भगवान पाटील (रा. मुर्टा) याच्या मालकीचे आहे. या प्रकल्पावर काम करणारे इलेक्ट्रिक इंजिनिअर पार्थ जनकराव त्रिवेदी (वय ३०, मूळ रा. सुरेंद्रनगर, गुजरात, सध्या रा. लातूर) यांच्याकडे आरोपी निखिल पाटील याने आणखी १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

“पैसे न दिल्यास विद्युत टॉवर कट करून नुकसान करेन,” अशी धमकी आरोपीने इंजिनिअर त्रिवेदी यांना दिली होती. त्यानंतर दि. २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेपूर्वी आरोपीने आपल्याच शेतातील टॉवरचे चारही लोखंडी खांब गॅस कटरच्या साहाय्याने कापले. विशेष म्हणजे, या टॉवरवरून १३२ केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीज वाहत असतानाच हा अत्यंत धोकादायक प्रकार करण्यात आला. यामुळे टॉवर कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची जाणीव असतानाही आरोपीने अत्यंत निष्काळजीपणे हे कृत्य केले. या प्रकारात कंपनीच्या साधनसंपत्तीचे तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याप्रकरणी इंजिनिअर पार्थ त्रिवेदी यांनी दि. २३ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून, नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपी निखिल भगवान पाटील याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ११०, ३२४(५), १२५ सह भारतीय विद्युत अधिनियम कलम १३९, १४० आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

Previous Post

४० वर्षांचा रस्ता अचानक जि.प.चा कसा झाला? अध्यक्षांच्या मनमानीला ठाकरे गटाचा दणका, समतानगरचा रस्ता पुन्हा मोकळा!

Next Post

रेशनचा माल मागितल्याच्या कारणावरून बाभळगावात एकाला लोखंडी सळईने बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

रेशनचा माल मागितल्याच्या कारणावरून बाभळगावात एकाला लोखंडी सळईने बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

July 28, 2026
विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

July 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; दुचाकी, सोलर केबल आणि बोअरवेलची वायर लंपास

July 28, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नळदुर्गात बँक अधिकाऱ्याच्या साहाय्याने मयत आई अन् आजारी वडिलांच्या बनावट सह्या करून कर्जाची उचल

July 28, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा तालुक्यातील औराद (गुं) येथे ७२ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण!

July 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!