• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव तहसीलदार मॅडमचं ‘आपकी अदालत’ ! सरकारी केबिनचं नवं नामकरण !!

admin by admin
January 21, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
धाराशिव तहसीलदार मॅडमचं ‘आपकी अदालत’ ! सरकारी केबिनचं नवं नामकरण !!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिवच्या तहसील कार्यालयात तहसीलदार मॅडमने सरकारी केबिनचं रूपांतर थेट ‘आपकी अदालत’मध्ये केल्याची बातमी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या चबुतऱ्यावर बसलेल्या “वाजे सिस्टर” यांनी न्यायदानाच्या जागेला चक्क न्यायालयाचा दरबार बनवलंय, पण त्याचा हेतू न्यायाधीशाचा रुबाब मिरवण्याचा वाटतोय!

ही केबिन पाहता, एखाद्या ऐतिहासिक महालातील चबुतऱ्याची आठवण होते. चबुतऱ्याचा उंचीवर खास लक्ष, सामान्य जनतेपासून स्वतःला “फुटभर” उंच ठेवण्याचा हा प्रकार, अनेकांना ‘समानतेच्या तत्त्वाचा’ विसर पडल्याचं सूचित करतो. “शासनाने कामासाठी दिलेला केबिन, तरीही एवढा रुबाब का?” हा प्रश्न जनतेच्या मनात घर करून बसलाय.

केबिनला चारही बाजूंनी बंदिस्त करून ‘सुरक्षित कटघरा’ तयार करण्यामागे यांचा उद्देश फक्त “फटके बसण्यापासून संरक्षण” असावा, अशी शंका लोकांना वाटू लागली आहे. तहसीलदारांसाठी सरकारनं कामाची जागा दिलीय, पण “वाजे सिस्टर”नी ती जागा ‘वैभव प्रदर्शन’ आणि ‘सामान्यांपेक्षा वरच्या स्तराचं भासवण्याचं साधन’ बनवलंय.

या अनोख्या “आपकी अदालत” प्रकारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधीच आपली नाराजी व्यक्त केली होती. “सर्व अधिकारी समान आहेत, मग तहसीलदारांनी असा खास चबुतरा कशासाठी?” असा सवाल त्यांनी केला होता.

आता धाराशिवमधील जनता विचारते, “जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे असं चबुतऱ्याचं ‘विशेष आसन’ नाही, मग वाजे सिस्टरलाच कशाचं एवढं भय?”

तहसील कार्यालयात लाखो रुपयांचा चुराडा करून नियमबाह्य पद्धतीने उभारलेला हा चबुतरा म्हणजे “सामान्यांचे कररूपाने भरलेले पैसे रुबाबासाठी उधळले जाण्याचं उदाहरण” आहे.

धाराशिवकर आता ठाम मत व्यक्त करत आहेत, “हे ‘आपकी अदालत’ बंद करावं, आणि वाजे सिस्टरला सरकारी भूमिकेचं भान द्यावं!”
शेवटी, सरकारी काम आहे म्हणून म्हणावं, पण इथे तहसीलदाराचं ‘केबिन ड्रामा’ पाहायला मिळालं!

Previous Post

कळंब : नोकरी लावण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप

Next Post

कळंब – वृद्धाला तोतया पोलिसाने लुटले, सोन्याची अंगठी चोरी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कळंब - वृद्धाला तोतया पोलिसाने लुटले, सोन्याची अंगठी चोरी

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!