धाराशिव – गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्या एका आयशर टॅम्पो चालकाविरुद्ध धाराशिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैराग कडून धाराशिव कडे एक गोवंशीय जनावरे भरलेले लाल रंगाचे आयशर वाहन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पथक हे मिळालेल्या बातमीवरुन लागलीच नमुद ठिकाणी जावून अंदाजे 13.45 वा. सु. तेथुन एक आयशर टॅम्पो येत असल्याचे पथकास दिसले त्यास पथकाने हात करुन थांबवले.
सदरील आयशर टॅम्पो क्र एमएच 04 जेके 9656 चे पथकाने निरीक्षण केले असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे दिसुन आली. सदरील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- तौफिक पाशा कागदी, वय 37 वर्षे, रा. वैराग नाका धाराशिव ता. जि. धाराशिव असे सागिंतले. नमुद आयशर टॅम्पो मध्ये गोवंशीय जातीच्या 10 जर्शी गाय अंदाजे 3,92,000 ₹ किंमतीच्या सह वाहन क्र एमएच 04 जेके 9656 असे एकुण 12,92,000 ₹ किंमतीचे जनावरे व वाहन मिळून आले.
सदरील गोवंशीय जनावरांना वाहनांमध्ये दाटीवाटीने भरण्यात आले होते. या गोवंशीय जनावरांना गाडीमध्ये हालचाल करण्यासाठी पर्याप्त जागा नव्हती. अत्यंत त्रासदायक पध्दतीने दाटीवाटीने भरुन अवैध रित्या कत्तल करणेसाठी त्यांची वाहतुक करण्यात येत होती. त्यावरुन पथकाने नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे धाराशिव शहर पोठा येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 215/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ), प्राण्याच्या निर्दयतेने वागविण्यात प्रतिबंध कायदा कलम 11(1) (बी) अन्वये गुन्हा नोदंवला आहे.