तुळजापूर : एका गावातील एक 20 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय)दि. 01.05.2024 रोजी 18.00 ते दि.02.05.2024 रोजी 07.00 हीस लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तीच्यावर पत्र्याच्या शेडमध्ये नेवून लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास त्याने तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि. 14.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-376, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : एका गावातील एक 16 वर्षीय मुलगी (नाव-गाव गोपनीय) दि. 14.05.2024 रोजी 01.30 वा. सु. हीस गावातील एका तरुणाने फोन करुन मी माझ्या जीवाचे बरेवाईट करीन अशी धमकी देवून घराबाहेर भेटण्यास बोलवून त्याच्या पत्रयाचे शेडमध्ये घेवून जावून लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास त्याने तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि. 14.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-376, 504, 507 सह पोक्सो 4, 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
विजेचा शॉक लागून मृत्यू
परंडा : मयत नामे-विशाल संदीपान बोकरे, वय 25 रा. परळी वैजीनाथ ता. परळी जि. बीड यांना आरोपी नामे-1)वरिष्ठ तंत्रज्ञ विकास शहाजी तांबे, 2)तंत्रज्ञ शाम ज्योतीराम कोळी दोघे रा. एम एस ई बी जवळा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 25.03.2024 रोजी 18.30 ते 19.00 वा. सु. सिरसाव शिवारात विजप्रवाह चालु असताना पोलवर चढायला लावून हायगई प निष्काळजीपणे विद्युत पुरवठा चालु आहे किंवा नाही या बाबत खात्री न करता नमुद आरोपीतांनी विशाल बोकरे यास पोलवर चढायला लावल्याने विजेचा शॉक लागून मयत झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आरती संदीपान बोकरे, वय 28 वर्षे, रा. परळी वैजीनाथ ता. परळी जि. बीड यांनी दि.14.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 304(अ), 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.