उमरगा : फिर्यादी नामे-विकास व्यंकट मोरे, वय 35 वर्षे, रा. जगदाळवाडी ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. फॅल्ट नं 206 अक्षय सोसायटी एन.डी.ए. रोड शिवणे ता. जि. पुणे हे आई व मावशी सोबत उमरगा येथुन गावाकडे जात असताना दि. 13.05.2024 रोजी 15.30 वा. सु.एनएच 65 रोडवर जगदाळेवाडी पाटी येथुन आरोपी नामे- अजय हणमंत मेकाले, 2) हणमंत भिमसु मेकाले, 3) गोविंद संजय मेकाले, रा. थोरलीवाउी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी महिंद्रा मॅक्सीमो मॅजीक क्र एमएच 13 एझेड 7476 या वाहनातुन येवून फिर्यादीस बोलावून गच्चीला धरुन उजवे खांद्यावर व हातावर मारहाण करुन खिशातील रेडमी कंपनीचा मोबाईल, 18 ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन व रोख रक्कम 2,000₹ असा एकुण 97,000₹ किंमतीचा माल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच फिर्यादीची आई, मावशी व भाउ ज्ञानेश्वर हे सोडवण्यास आल्या असता त्यांना पण धक्काबुकी करुन ढकलून देवून दगडाने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास मोरे यांनी दि.14.05.2024 रोजी दिलेल्या वैद्यकिय जबाबावरुन उमरगा पो. ठाणे येथे 394, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे- शंकर यंका माने, वय 52 वर्षे, रा.नितळी ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची बजाज प्लाटिना लाल रंगाची एमएच 25 एटी 5583 जिचा चेसी नं- MD2B77AX9LWD03138 व इंजिन नं-PFXWLD34045 ही दि.23.04.2024 रोजी 16.00 ते 20.30 वा. सु.येरमाळा येथील कल्लोळचे मलकापुर रोडकडे जाणारा कच्चा रस्ता येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शंकर माने यांनी दि.14.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.