• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक करणे पडले महागात, धाराशिवच्या तरुणाला दीड लाखांचा गंडा

admin by admin
July 5, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: व्हॉट्सॲपवर आलेल्या एका अनोळखी लिंकवर क्लिक करणे धाराशिवमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक होऊन बँक खात्यातून दीड लाख रुपये लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सायबर फसवणुकीप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवर्धनवाडी येथील रहिवासी आदित्य पांडुरंग भालेराव (वय २३) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ही घटना १९ एप्रिल २०२५ ते २० एप्रिल २०२५ दरम्यान घडली. आदित्य हे धाराशिव येथील रघुवीर बजाज शोरूममध्ये असताना त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर (8830041593) एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून (8714363657) एक लिंक आली होती.

उत्सुकतेपोटी किंवा अनावधानाने आदित्य यांनी त्या लिंकवर क्लिक करताच त्यांचा मोबाईल फोन हॅक झाला. त्यानंतर सायबर चोरांनी त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात परस्पर प्रवेश करून १,५०,००० रुपये काढून घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली.

या घटनेनंतर आदित्य भालेराव यांनी ४ जुलै २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी) व ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी व्हॉट्सॲप, मेसेज किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावर अनोळखी नंबरवरून आलेल्या किंवा संशयास्पद वाटणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये जुन्या वादातून वाहनाची तोडफोड, चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

वाशी तालुक्यात २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार; जीवे मारण्याची धमकी देत दोनदा केले दुष्कृत्य

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

वाशी तालुक्यात २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार; जीवे मारण्याची धमकी देत दोनदा केले दुष्कृत्य

ताज्या बातम्या

‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!

September 26, 2026
टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

September 26, 2026
ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

September 26, 2026
धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

September 25, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश

September 24, 2026

Recent Posts

  • गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!
  • टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!
  • ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’
  • धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड
  • गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!