धाराशिव जिल्ह्यातील मुरुम, उमरगा आणि वाशी पोलीस ठाण्यात मारहाणीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
मुरुम: मुरुम येथे मुन्ना फॅशन दुकानाजवळील पानटपरी समोर आकाश राठोड या तरुणाला तिघांनी मागील भांडणाच्या कारणावरून तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले. मोहन वासुदेव, तिर्थ मंडले (दोघेही बेरडवाडी) आणि सुंदर पाटील (दाळींब) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-मोहन वासुदेव, तिर्थ मंडले, दोघे रा. बेरडवाडी ता. उमरगा जि. धाराशिव, सुंदर पाटील, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 31.10.2024 रोजी 22.30 वा. सु. मुन्ना फॅशन दुकानाजवळील पानटपरीचे समोर मुरुम येथे फिर्यादी नामे-आकाश शिवराम राठोड, वय 27 वर्षे, रा.शास्त्रीनगर तांडा दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, तलवारीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश राठोड यांनी दि.02.11.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 109, 115(2), 352, 351(2) (3) ,3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे
उमरगा: औराद ते उमरगा रस्त्यावर गणेश सुर्यवंशी या तरुणाला पाच जणांनी मारहाण केली. अशोक राठोड, बालाजी जाधव, अजय पवार, अमोल पवार आणि विजय पवार (सर्व औराद) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्यांनी आणि हंटरने मारहाण केली. यावेळी सुर्यवंशी यांची अंगठी आणि त्यांच्या चुलत बहिणीचे गळ्यातील सोन्याचे गंठणही पडून हरवले.
आरोपी नामे-अशोक राम राठोड, बालाजी धोंडीराम जाधव, अजय विठ्ठल पवार,अमोल विठ्ठल पवार, विजय पवार रा. औराद ता.उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 02.11.2024 रोजी सांयकाळी 07.00 वा. सु. औराद ते उमरगा येथे फिर्यादी नामे-गणेश ओमकुमार सुर्यवंशी, वय 21 वर्षे, रा.औराद गुं., ता.उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून रस्त्यात आडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटरने मारहाण करुन जखमी केले.तसेच फिर्यादीची चुलती या भाडंण सोडवण्यास आल्या असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण करत असताना फिर्यादी यांची अंगठी व चुलतीचे गळ्यातील सोन्याचे गंठन तुटून कोठेतरी पडून गाहाळ झाले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणेश सुर्यवंशी यांनी दि.02.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 126(2),189(2),191(2),191(3), 118(1), 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी: चांदवड शिवारातील शेतात विठ्ठल सुरवसे यांना आणि त्यांच्या पत्नी व मुलीला विहिरीवरील मोटर चालू करण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. संजय सुरवसे, जनाबाई सुरवसे, अनुष्का सुरवसे आणि उषा सुरवसे (सर्व चांदवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-संजय शिवाजी सुरवसे, जनाबाई संजय सुरवसे,अनुश्का सोमदेव सुरवसे, उशा बाळू सुरवसे रा. चांदवड ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.02.11.2024 रोजी 02.30 वा. सु. चांदवड शिवारातील शेतात फिर्यादी नामे-विठ्ठल चंदर सुरवसे, वय 40 वर्षे, रा.चांदवड ता. भुम जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी व मुलगी यांना नमुद आरोपींनी विहीरीवरील मोटर चालू करण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश राठोड यांनी दि.02.11.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351 (3) ,3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे