ढोकी : फिर्यादी नामे- वरुण रामजीत वीके, वय 18 वर्षे, व्यवसाय क्लिनर रा. धामदई पोष्ट रामजीपुरा ता. भेजदई जि. भेयतुल राज्य मध्यप्रदेश हे व सोबत ड्रायव्हर नामे- शिलेक मुंगीलाल दुर्वे, रा. बकारर्जुन मध्ये प्रदेश हे दोघे मोहा येथुन जॉन डिअर कंपीनचा 5310 मॉडेल, हिरव्या रंगाचे ट्रॅक्टर क्र एमएच 25 ए.एस 7856 दोन ट्राली मध्ये उस भरुन वाघोली ते कसबे तडवळे जाणारे रोडवर तडवळे शिवारातुन जात होते , दरम्यान अनोळखी पाच व्यक्तीने दोन दुचाकीवर येवून फिर्यादीस व ड्रायव्हर यांना मारहाण करुन दमदाटी करुन ट्रॅक्टर व ड्रायव्हरचे पॉकेट ज्या मध्ये रोख रक्कम 200 ₹, आधाराकार्ड व लायसन्स असा एकुण 8,50,000₹ किंमतीचा माल हा दि. 09.01.2024 रोजी 22.00 वा. सु. जबरीने चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वरुण वीके यांनी दि.11.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 395 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : फिर्यादी नामे-अब्दुल युसुफ सत्तार शेख, वय 49 वर्षे, रा. सी.एल/गट नंबर 180/2/2 के/1 माढा कॉलनी समर्थ नगर गाडेगाव रोड बर्शी ता. बार्शी जि. सोलापूर ह.मु. शासकिय आद्यौगिक प्रशिक्षण संस्था कासिम बाग करमाळा रोड परंडा जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची काळ्या रंगाची युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 13 बी.ली. 4384 ही दि.10.01.2024 रोजी 10.00ते 17.30 वा. सु. शासकिय आद्यौगिक प्रशिक्षण संस्था कासिम बाग करमाळा रोड परंडा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अब्दुल युसुफ शेख यांनी दि.11.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.