भुम: भुम तालुक्यातील वालवड येथे डॉ. वाघमारे हॉस्पिटल समोर योगेश उर्फ अतुल मोहिते यांना चार जणांनी मारहाण केल्याची घटना घडली. पांडुरंग मोहिते, गौतम मोहिते, प्रशांत मोहिते आणि उषाबाई लोमटे अशी आरोपींची नावे आहेत. मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी योगेश यांना शिवीगाळ करून मोटरसायकल आडवी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी गज, लाकडी काठी, दगड आणि तिखट डोळ्यात टाकून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढोकी: ढोकी तालुक्यातील साठे नगर तेर येथे अजिंक्य कांबळे यांना सात जणांनी मारहाण केल्याची घटना घडली. वैभव साळुंके, जयसंग्राम रसाळ, ललीता साळुंके, ओमसंग्राम रसाळ, नितीन रसाळ, बायनाबाई रसाळ आणि मोहरबाई रसाळ अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून अजिंक्य यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, कोयता आणि चाकूने मारहाण करून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अजिंक्य यांच्या आजींनाही आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही घटनांमध्ये आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.