शेगाव : वंचित बहुजन आघाडीच्या पक्षांतर्गत निवडणुका आज शेगाव येथे पार पडल्या. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार झालेल्या या निवडणुकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश आंबेडकर यांची बिनविरोध निवड झाली. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील बारा सदस्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील डॉ. नितीन ढेपे यांचा समावेश आहे.
डॉ. ढेपे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे त्वचारोग तज्ञ असून त्यांना “लेसर मॅन” म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय संघटक असलेले डॉ. ढेपे हे ओबीसी विचारवंत म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
वंचित बहुजन आघाडी आता ओबीसी वर्गाकडे आपला पाया वाढवत असून, डॉ. ढेपे यांच्या निवडीमुळे पक्षाला बळकटी मिळणार आहे. ओबीसी आरक्षण, सर्वसमावेशक हिंदुत्व, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मिती यासारख्या महत्वाच्या विषयांवर वंचितच्या थिंक टँकमध्ये ते महत्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा आहे.डॉ. ढेपे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.