शिराढोण, ता. कळंब येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 68 वर्षीय रामकृष्ण जालीदंर गिरी यांचा मृत्यू झाला. कळंब ते लातुर जाणाऱ्या रस्त्यावरून पायी चालत असताना आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गिरी यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत रामकृष्ण गिरी यांचे पुत्र मदन रामकृष्ण गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिराढोण पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध भादंवि कलम 106, 281, 125 (ए), सह मोवाका कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त टेम्पो क्रमांक एमएच 14 डीएम 2364 असून चालकाने तो हायगयी व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात घडला.या घटनेमुळे शिराढोण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.