भुम – तालुक्यातील वरुड येथे 15 ऑगस्ट रोजी रात्री एका गंभीर मारहाणीची घटना घडली. या घटनेत मुरलीधर पांडुरंग चोरमले (वय 55) यांना पाच जणांनी लाथाबुक्यांनी, काठी व दगडांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाण सोडवण्यासाठी आलेल्या चोरमले यांच्या आई व बहिणीलाही आरोपींनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी नामे-योगेश क्षिरसागर, गंगाधर क्षिरसागर, नन्या क्षिरसागर, अरविंद क्षिरसागर, अरविंद क्षिरसागर सर्व रा. वरुड ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.15.08.2024 रोजी 21.00 वा. सु. वरुड येथे फिर्यादी नामे-मुरलीधर पांडुरंग चोरमले, वय 55 वर्षे, रा. वरुड ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.फिर्यादीची आई सुमन व बहिण किस्कींदा माने या भांडण सोडवण्यास आल्या असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मुरलीधर चोरमले यांनी दि.24.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. 115(2), 118(1), 118(2), 189(2), 191(2), 190, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सांगवी मार्डीमध्ये आर्थिक व्यवहारावरून मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
तुळजापूर तालुक्यात सांगवी मार्डी येथे 22 ऑगस्ट रोजी दुपारी आर्थिक व्यवहारावरून एकाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत मुकुंद दुर्गाप्पा पवार (वय 34) यांना पाच जणांनी लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामे-अनिल सुनिल पवार, विलास गायकवाड, कैलास गायकवाड, राजु बागल सर्व रा. सांगवी मार्डी, ता. तुळजापूर जि. धाराशिव, गोरख भागवत पारधे, रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.08.2024 रोजी 16.45 वा. सु. सांगवी मार्डी रोड येथील ब्रीज जवळ फिर्यादी नामे-मुकूंद दुर्गाप्पा पवार, वय 34 वर्षे, रा.सारोळा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मुरलीधर चोरमले यांनी दि.24.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 115(2), 126(2), 118(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
कळंबमध्ये जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण, एकावर गुन्हा दाखल
कळंब शहरात 23 ऑगस्ट रोजी रात्री एकाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी युवराज पिंगळे याच्याविरुद्ध भादंवि कलम 352 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हारी बारीकराव गायकवाड (वय 35 वय, रा.इंदीरानगर कळंब) यांना आरोपीने ओळख करून देण्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच, त्यांनी काचेच्या रिकाम्या बाटलीनेही मारहाण केल्याने गायकवाड जखमी झाले. या घटनेनंतर गायकवाड यांनी 24 ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.