धाराशिव – येथील रहिवासी संगिता कोरे यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २२ ऑगस्ट रोजी घडली. कोरे या सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत ही चोरी झाली. अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीचे हे २0 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण होते.
फिर्यादी नामे-संगिता अशोक कोरे वय 55 वर्षे, रा.येडशी ता. जि. धाराशिव या दि.22.08.2024 रोजी 14.00 ते 14.30 वा. सु. धाराशिव बसस्थानक येथे सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून संगिता कोरे यांचे गळ्यातील सोन्याचे 20 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण अंदाजे 1,20,000 ₹ किंमतीचे चोरुन नेले.
या घटनेची फिर्याद कोरे यांनी दोन दिवसांनी म्हणजेच दि. २४ ऑगस्ट रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.