उमरगा: उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी शिवारात ९ सप्टेंबर रोजी एका दुर्दैवी अपघातात ६० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मोटरसायकलवरून उतरून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात असलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. या घटनेत तेजाबाई दत्तात्रय डोंबे (वय ६०, रा. उजळंब, जि. बिदर) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहनचालक रहीमान शब्बीर लदाफ (रा. काळे प्लॉट, उमरगा) याच्याविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेचा मुलगा निवृत्ती डोंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लदाफ याने आपले वाहन हयगयी व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात घडला.
पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४(अ) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.