धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाशी, उमरगा आणि बेंबळी पोलीस ठाण्यांत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
वाशी: वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. जि.प.प्र. शाळेतून अज्ञात चोरट्यांनी २५,००० रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला आहे. तर दुसऱ्या घटनेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून २०,००० रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेली आहे.
दि.26.06.2024 रोजी 16.15 ते दि.25.06.2024 रोजी 09.30 वा. सु. घाटपिंप्री ता. वाशी जि. धाराशिव येथील जि.प.प्र.शाळाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन शाळेतील 32 इंची एलईडी टिव्ही अंदाजे 25,000₹ किंमतीची चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव भगवान भैरट, वय 56 वर्षे,व्यवसाय नोकरी मुख्याध्यापक जि.प.प्र शाळा घाटपिंप्री ता. वाशी जि. धराशिव यांनी दि.12.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी नामे-शहाजी रावसाहेब काळे, वय 54 वर्षे, रा.केळेवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो होंडा कपंनीची स्पेलंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 14 ईएफ 4588 ही दि. 11.09.2024 रोजी 16.20 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी चौकातील भेळच्या गाड्यासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शहाजी काळे यांनी दि.12.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा: उमरगा तालुक्यातील बाबळसुरा येथे घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४८,५०० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे-अशोक रामराव पाटील, वय 65 वर्षे, रा. बाबळसुरा, ता. उमरगा जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप आरोपी नामे- गोकुळ रतन गायकवाड, गोविंद माधव गायकवाड दोघे रा.बाबळसुरा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.17.08.2024 रोजी तोडून घरातील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम 20,000₹ असा एकुण 48,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक पाटील यांनी दि.12.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 331(4),305(1), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी: बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्याच्या शेतातून ४०,००० रुपये किमतीची म्हैस चोरीला गेली आहे.फिर्यादी नामे-आंबादास नेताजी यादव, वय 43 वर्षे, रा.ताकविकी ता. जि. धाराशिव यांचे ताकविकी शिवारातील शेतातील शेडसमोर बांधलेली म्हैस अंदाजे 40,000₹ किंमतीची ही दि.09.09.2024 रोजी 23.00 ते दि. 10.09.2024 रोजी 06.00 वा. सु.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आंबादास यादव यांनी दि.12.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या सर्व घटनांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.