• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सत्तेचा माज अन् सत्याचा आवाज: ‘धाराशिव लाईव्ह’ची लेखणी कुणाच्या बापाला घाबरत नाही!

admin by admin
February 25, 2026
in सडेतोड
Reading Time: 1 min read
सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनो, नियतीचा न्याय तुम्हालाही सुटणार नाही!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

पत्रकारितेत ऊन-पावसाचे चटके खात तब्बल ३५ वर्षे लोटली. ‘लोकमत’, ‘एकमत’, ‘लोकसत्ता’, ‘गावकरी’ अशा दिग्गज आणि नामवंत दैनिकांच्या मुशीत तावून-सुलाखून निघाल्यानंतर, जेव्हा डिजिटल मीडियाचे नुसते वारे वाहू लागले होते, तेव्हा १४ वर्षांपूर्वी मी ‘धाराशिव लाईव्ह’ची ठिणगी टाकली.

धाराशिवसारख्या मागास जिल्ह्यात, जिथे २G च्या स्पीडवर इंटरनेट रांगायचं आणि बातम्या फक्त कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर वाचल्या जायच्या, तिथे हा ‘डिजिटल’ प्रयोग अनेकांना चेष्टेचा विषय वाटला. त्यावेळी माझ्यावर हसणारे आज काळाच्या ओघात कुठे फेकले गेले, हे त्यांनाही समजले नाही. जे हसले, ते फसले आणि मागे पडले! जग बदलले, स्मार्टफोन आले, ५G आले आणि ‘डिजिटल मीडियात’ क्रांती झाली. ‘धाराशिव लाईव्ह’ने काळाच्या पुढचे पाऊल टाकत जिल्ह्याच्या माथ्यावर ‘नंबर १ डिजिटल चॅनल’चा मुकुट चढवला.


आमची ओळख: एक निर्भीड आणि सडेतोड व्यासपीठ

‘धाराशिव लाईव्ह’ची ओळख काय? तर एक निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड चॅनल! बातमी देताना आम्ही कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाही, कुणाची आरती ओवाळत नाही. सत्य हेच आमचे भांडवल.

याच बाणेदार पत्रकारितेतून आम्ही तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, तुळजापूर बस स्थानक प्रकरण आणि  पोकळ घोषणांचा असा काही पर्दाफाश केला, की अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली.

सत्य पचनी न पडल्याने चवताळलेला ‘नेता’

आमच्या या सडेतोड पत्रकारितेमुळे तुळजापूरचा एक सत्ताधारी नेता चांगलाच चवताळला आहे. स्वतःला ‘मोठा नेता’ समजणाऱ्या या महाशयांची तुळजापूर आणि धाराशिव तालुका सोडला, तर बाहेर कवडीचीही किंमत नाही. पण सत्तेच्या मस्तीत वावरणाऱ्या या नेत्याचा खरा चेहरा ‘धाराशिव लाईव्ह’ने वेशीवर टांगला.

सत्य पचनी न पडल्याने या महाशयांनी आधी भाडोत्री यंत्रणेकडून माझी सोशल मीडियावर बदनामी मोहीम चालवली. तेवढ्याने समाधान न झाल्याने ५०० जणांचा जमाव गोळा करून पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि म्हणे, “सुनील ढेपेच्या संपत्तीची चौकशी करा!”

त्यांच्या या पोरकटपणावर मी त्यांना उघड्यावर एकच थेट आव्हान दिले:

“माझी सगळी संपत्ती या नेत्याच्या नावावर करा आणि त्याची सगळी संपत्ती माझ्या नावावर करा. त्याची आलेली सगळी संपत्ती मी गोरगरीब जनतेला वाटून टाकीन!”

या एका आव्हानाने त्यांची बोलतीच बंद झाली.

गुंडांचा आधार आणि पोलिसांचा गैरवापर

स्वतः मैदानात यायची हिंमत नसल्याने या नेत्याने आपले तीन ‘चमचे’ पुढे केले आणि पत्रकार परिषद घेऊन “आम्ही पत्रकारांच्या विरोधात नाही, फक्त सुनील ढेपेंच्या विरोधात आहोत,” असा केविलवाणा बचाव केला.

माझा गुन्हा काय? मी जनतेसमोर सत्य छापतो, हा माझा गुन्हा?

सत्तेचा आणि पैशाचा माज इतका की, ज्याच्यावर १८ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा तुळजापूरच्या एका तथाकथित गुंडाला हाताशी धरून माझ्यावर एक-दोन नव्हे, तर चक्क तीन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. यासाठी पोलिसांच्या बळाचाही पुरेपूर वापर करण्यात आला.

प्रवृत्तीविरुद्धचा लढा सुरूच राहील!

पण या सत्तेच्या ठेकेदारांना एकच ठणकावून सांगणे आहे-

तुम्ही कितीही बदनामी करा, कितीही खोटे गुन्हे दाखल करा, तुम्हाला जो पोलीस बळाचा वापर करायचा आहे तो करा… पण सत्य छापायला ही लेखणी कचरत नाही! तुमचा खरा, भ्रष्ट ,ढोंगी, मुखवटा पांघरलेला आणि बुरसटलेला चेहरा जनतेला दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.

लक्षात ठेवा, माझी लढाई कुणा एका व्यक्तीविरुद्ध नाही, तर सत्तेचा गैरवापर करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीविरुद्ध आहे. आणि ही लढाई सत्याचा विजय होईपर्यंत अशीच धगधगत राहील!

– सुनील ढेपे (संपादक, धाराशिव लाईव्ह)


Previous Post

‘सत्तेच्या लालसेत आशेचा दिवा पेटवणारा नेता’…

Next Post

खा. ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; १४ वर्षांखालील मुलींना मिळणार मोफत ‘एचपीव्ही’ लस!

Next Post
खा. ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; १४ वर्षांखालील मुलींना मिळणार मोफत ‘एचपीव्ही’ लस!

खा. ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; १४ वर्षांखालील मुलींना मिळणार मोफत 'एचपीव्ही' लस!

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026

Recent Posts

  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!