पुण्यातील ससाणेनगरमध्ये घडलेली ही घटना अगदीच फिल्मी आहे. एका भामट्याने शेअर मार्केटच्या नावावर लोकांना स्वप्न दाखवून बँकेसारखी रक्कम गोळा केली, पण नंतर पैसे दुप्पट करण्याचे सोडून सरळ पाय उचलले आणि पलायन केले. या कथेचा नायक – प्रतीक चौखंडे, वय ३५ वर्षे, याने आपल्या “शेअर मार्केट क्लास” नावाच्या जादूच्या डब्ब्यातून लोकांना पैसे दुप्पट करून देण्याची करामत दाखवली.
सुरुवातीला तर हा नटखट गुरूजवळ शिकवायच्या क्लासमध्ये काही ना काही जादू नक्कीच होती. दरमहा १० ते २५ टक्के व्याज मिळवून देतो म्हणत, लोकांचे पैसे गोळा केले. “पैसे आणा, आणि पाहा तुमचे नशीब कसे चमकते” असा त्याचा नारा होता. पहिल्याच काही महिन्यात त्याने लोकांना स्वप्नातले व्याज दिले आणि हळूहळू लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली. कुणी १ लाख, कुणी ५ लाख, तर कुणी ५० लाख देखील गुंतवले. सगळ्यांना वाटलं की आता आपणही अंबानीसारखे होणार!
पण ही स्वप्नं उडण्याआधीच चौखंडे साहेबांनी आपली पांढरी हॅट घालून, पांढरा शर्टर बंद करून, आणि लवकरच त्याचा फोन स्विच ऑफ करून गायब झाले. म्हणजे, एका सिनेमातलं ‘हीरो’ कुठेतरी शेवटी वळणावर पळून जावं तसं! लोकांनी शेवटी गोंधळून हडपसर पोलीस स्टेशन गाठलं, आणि पोलिसांनी मग चौखंडे विरुद्ध गुन्हा दाखल केला.
हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच आयुक्त कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेने प्रतीक चौखंडे मुसक्या आवळल्या आहेत.कोर्टाने त्यास पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. दुसरीकडे फसवणूक झालेले लोक पोलीस आयुक्त कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा गाठून कैफियत नोंदवत आहेत. लोकांनी पुंजी – पुंजी गोळा करून ठेवेलेले पैसे वर्षभरात दुप्पट होतील या अपेक्षेने प्रतीक चौखंडेकडे गुंतवले आणि त्याने पद्धतशीर लोकांचा काटा काढला.
धाराशिव शहरात राहणारा आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात काम करणारा हाडाचा एक डॉक्टर देखील या जाळ्यात अडकला आहे. त्याचे दहा लाख बुडाले आहेत तर समतानगरमधील एका जोश्याचे देखील पाच लाख अडकले आहेत. तसेच धाराशिवमधील काही लोक देखील प्रतीक चौखंडेच्या जाळ्यात फसले आहेत. या सर्वांची मिळून किमान ५० लाख रुपये रक्कम अडकली आहे आणि तशी फिर्याद आयुक्त कार्यालयात दाखल झाली आहे. ज्यांचे पैसे अडकले त्यांना आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.