• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 गावसूदमध्ये २१ व्या शतकाला आव्हान, कायद्याच्या अक्षता टाकत बालविवाहाचा ‘शुभ’मंगल ‘अ’सावधान थाट!

धाराशिवच्या गावसूदमध्ये कायद्याची ‘हळद’ लागली अन् प्रगती ‘बोहल्यावर’ चढली?

admin by admin
May 26, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
 गावसूदमध्ये २१ व्या शतकाला आव्हान, कायद्याच्या अक्षता टाकत बालविवाहाचा ‘शुभ’मंगल ‘अ’सावधान थाट!
0
SHARES
918
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

काय म्हणे प्रगती? काय म्हणे २१ वं शतक? धाराशिव जिल्ह्यातलं गावसूद नावाचं गाव मात्र अजूनही भूतकाळातच रमलंय, अन् तेही बालविवाहाच्या काळोख्या भूतकाळात! जिथं पोरीबाळींच्या हाती पाटी-पेन्सिलऐवजी थेट संसाराचं जोखड दिलं जातंय, तिथं प्रगतीच्या गप्पा हवेतच विरून जातात राव!

‘लेटेस्ट एपिसोड’: अल्पवयीन अक्षता!

ताजं ‘उदहारण’ म्हणजे गवसूदमध्ये झालेला बालविवाह, मुलीचे वय १६ ( जन्मतारीख ९ मे २०१०!)  तर मुलाचे वय वय १८. म्हणजे काय, तर वधूपक्ष आणि वरपक्ष दोघंही कायद्याच्या भाषेत ‘बच्चा पार्टी’! पण इथं कायद्याला कोण विचारतोय? हळदीचे आणि लग्नाचे फोटो-व्हिडीओ तर सोशल मीडियावर असे काही व्हायरल झालेत, जणू काही ऑलिम्पिक मेडलच जिंकलंय! विशेष म्हणजे, दोन आठवड्यातला हा तिसरा बालविवाह ठरता ठरता राहिला, यातला एक तर ऐन मांडवातून महिला व बालविकास विभागाने उचलला होता म्हणे!

सरकारी ‘कोमा’? अधिकारी गप्प, कायदा सुस्त!

अहो, हे सगळं घडत असताना गावाचे ‘कर्तेधर्ते’ ग्रामसेवक, जिल्ह्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, ज्यांच्यावर “बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६” ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, ते काय करत होते? सरपंच, अंगणवाडी ताई, ज्यांनी गावपातळीवर हे रोखायला हवं, त्यांची तोंडून ‘ब्र’ ही नाही! म्हणजे, कायदा फक्त कागदावर नाचवायचा आणि प्रत्यक्षात बालविवाहांच्या तालावर गाव नाचवायचं, असंच काहीसं चित्र दिसतंय. सूत्रांनी तर याच कुटुंबातील मोठ्या मुलाचाही बालविवाह पाच महिन्यांपूर्वी डोंबिवलीत झाल्याचा गौप्यस्फोट केलाय. म्हणजे ही तर ‘परंपरा’च दिसतेय!

कायद्याचा धाक की फक्त नावापुरता धाक?

  • बालविवाह म्हणजे काय? जिथं नवरा किंवा नवरीपैकी कुणी एक जरी १८ (मुलगी) किंवा २१ (मुलगा) वर्षांपेक्षा कमी वयाचं असेल, तो विवाह.
  • शिक्षा काय? प्रौढ पुरुषाने बालविवाह केल्यास २ वर्षांपर्यंत सश्रम कारावास किंवा १ लाख रुपये दंड, किंवा दोन्ही! हा विवाह लावणाऱ्यांनाही तुरुंगवारीची हवा!
  • जबाबदार कोण? ग्रामसेवक, बालविकास प्रकल्प अधिकारी हेच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी! त्यांना मदत करण्यासाठी अंगणवाडी ताई आणि बाल संरक्षण समिती.

धाराशिवचा महिला व बालविकास विभाग झोपलाय का?

हे सगळं बघता, जिल्हा महिला व बालविकास विभाग नक्की काय दिवे लावतोय, असा संतप्त सवाल कुणाच्याही मनात येईल. बालविवाहामुळे मुला-मुलींचं शिक्षण थांबतं, लैंगिक शोषण होतं, बालमाता जन्माला येतात, घटस्फोट वाढतात आणि एकल मातृत्वाचा भार येतो. या सगळ्या समस्यांना आपणच निमंत्रण देतोय.

आता तरी जागे व्हा!

समाज म्हणून आपण डोळे उघडे ठेवले नाहीत, तर गावसूदसारखी गावं ‘बालविवाहाची पंढरी’ बनायला वेळ लागणार नाही. कुणालाही बालविवाहाची माहिती मिळाल्यास १०९८ या नंबरवर कळवा. तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल. नाहीतर हे ‘शुभमंगल’ आपल्या समाजासाठी ‘अशुभ’ ठरल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की!

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Next Post

शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे व पिक प्रात्यक्षिकांचा लाभ; अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे व पिक प्रात्यक्षिकांचा लाभ; अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे व पिक प्रात्यक्षिकांचा लाभ; अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group