• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

हरित धाराशिव २.० चा तांत्रिक बोजवारा! QR कोड स्कॅन होईना, ॲपमध्ये भलताच सावळागोंधळ

३०० चं टार्गेट, तासाभरात फक्त ३० स्कॅन; गिनीज रेकॉर्डच्या नादात सरकारी ॲप फेल!

admin by admin
August 14, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
हरित धाराशिव २.० चा तांत्रिक बोजवारा! QR कोड स्कॅन होईना, ॲपमध्ये भलताच सावळागोंधळ
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: उत्स्फूर्त लोकसहभागातून राबवल्या जाणाऱ्या ‘हरित धाराशिव २.०’ या १० लक्ष वृक्ष लागवड मोहिमेला आता ‘तांत्रिक अडचणींचे’ मोठे ग्रहण लागले आहे. गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी प्रशासनाने आणलेल्या ॲपचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, उन्हातान्हात राबून झाडे लावणाऱ्या स्वयंसेवकांच्या पदरी मात्र निराशा आणि संताप पडत आहे.

नेमका तांत्रिक गोंधळ काय?

मुरूम येथील स्वयंसेवक संतोष चिलोबा यांनी प्रशासनाच्या या हायटेक मोहिमेतील ‘लो-टेक’ सत्य समोर आणले आहे. त्यांच्या अनुभवानुसार, प्रत्यक्ष खड्डा खोदून झाड लावण्यापेक्षा, त्याची ऑनलाइन नोंदणी करणे हे सर्वाधिक डोकेदुखीचे काम बनले आहे.

  • स्कॅनिंगचा कासवगती वेग: झाडांवर लावलेले QR कोड लवकर स्कॅनच होत नाहीत. प्रत्येक स्वयंसेवकाला ३०० झाडे स्कॅन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात तासभर खपूनही जेमतेम ३० झाडे स्कॅन करण्यातच नाकीनऊ येत आहेत.
  • नंबर माझा, नाव दुसऱ्याचे!: संतोष चिलोबा यांनी त्यांच्या स्वतःच्या नंबरवरून ॲपमध्ये लॉगिन केले. सुरुवातीला सर्व ठीक होते, पण त्यानंतर अचानक ॲपवर ‘Error’ दिसू लागला आणि त्यांच्या प्रोफाईलवर किशोर भागवत गायकवाड हे नाव झळकू लागले! मोबाईल नंबर चिलोबा यांचा, पण सिस्टिमवर नाव मात्र दुसऱ्याचेच, यामुळे गोंधळ उडाला आहे.
  • क्रेडिट कोणाला? आकड्यांचा खेळ: प्रत्यक्षात जेवढी झाडे लावली आहेत, त्यापेक्षा पूर्णपणे वेगवेगळे आकडे सिस्टिमवर दिसत आहेत. यामुळे नेमकी किती झाडे लागली आणि त्या कष्टाचे ‘क्रेडिट’ नेमके कोणाला मिळणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुरूममध्ये झाड, लोकेशन मात्र वाशीचे!

या ॲपचा सगळ्यात मोठा ‘कहर’ म्हणजे लोकेशनचा झोल. चिलोबा यांनी विठ्ठलसाई साखर कारखाना (मुरूम) परिसरात झाडे लावली आणि स्कॅन केली. मात्र, ॲपवर त्या झाडांचे लोकेशन चक्क वाशी तालुक्यात दाखवत होते!
उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या नागरिकांचा उत्साह प्रशासनाच्या या तांत्रिक ढिसाळपणामुळे मावळत आहे.

मग अचूक रेकॉर्ड कसा तयार होणार?

एकीकडे १० लाख वृक्ष लागवडीचे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे ढोल पिटले जात आहेत, तर दुसरीकडे सरकारी सिस्टिममध्येच अशा चुकीच्या नोंदी होत आहेत. जर ॲपमध्येच एवढ्या भयंकर त्रुटी असतील, तर लागवड झालेल्या झाडांची अचूक आकडेवारी सरकारी रेकॉर्डमध्ये कशी दिसणार? आणि या सदोष आकडेवारीच्या आधारावर रेकॉर्ड कसा ग्राह्य धरला जाणार? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

 

Previous Post

झेडपीच्या सभेत फुटले ‘भ्रष्टाचाराचे बॉम्ब’! ‘वजना’शिवाय फायली सरकेनात आणि अधिकारी ‘गायब’!

Next Post

‘हरित धाराशिव’चा काळा चेहरा! जुनी झाडे तोडण्यासाठी १ कोटी १५ लाख खर्च; घोटाळेबाज अधिकारी अन् अतिक्रमणधारकांचे “तेरी भी चूप, मेरी भी चूप”

Next Post
‘हरित धाराशिव’चा काळा चेहरा! जुनी झाडे तोडण्यासाठी १ कोटी १५ लाख खर्च; घोटाळेबाज अधिकारी अन् अतिक्रमणधारकांचे “तेरी भी चूप, मेरी भी चूप”

'हरित धाराशिव'चा काळा चेहरा! जुनी झाडे तोडण्यासाठी १ कोटी १५ लाख खर्च; घोटाळेबाज अधिकारी अन् अतिक्रमणधारकांचे "तेरी भी चूप, मेरी भी चूप"

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या

September 28, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

September 27, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

ढोकी : जिल्हा फळरोपवाटिकेत बेकायदेशीर अतिक्रमण; कृषी अधिकाऱ्याला धक्काबुक्की अन् रखवालदारांचे कपडे फाडून मारहाण

September 27, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सुरतगाव : बांधावरील झाडे काढण्यावरून शेतात रक्तरंजित राडा; कोयता व लोखंडी हत्याराने मारहाण करत ३ तोळ्यांचे सोने लुटले

September 27, 2026
पर्यटन दिनाचे ‘फेसबुकिया’ गाजर: साहेबांचा ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!’

पर्यटन दिनाचे ‘फेसबुकिया’ गाजर: साहेबांचा ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!’

September 27, 2026

Recent Posts

  • धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या
  • धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात
  • ढोकी : जिल्हा फळरोपवाटिकेत बेकायदेशीर अतिक्रमण; कृषी अधिकाऱ्याला धक्काबुक्की अन् रखवालदारांचे कपडे फाडून मारहाण
  • सुरतगाव : बांधावरील झाडे काढण्यावरून शेतात रक्तरंजित राडा; कोयता व लोखंडी हत्याराने मारहाण करत ३ तोळ्यांचे सोने लुटले
  • पर्यटन दिनाचे ‘फेसबुकिया’ गाजर: साहेबांचा ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!’
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!