• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा शहरात घरफोडीच्या घटना; नागरिक भयभीत

admin by admin
January 21, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
241
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा: शहरातील चोरीच्या घटना वाढत असून रविवारी (दि. 19) धनलक्ष्मी कॉलनीत दोन घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. चोरीतील एकूण रक्कम सुमारे चार लाख रुपये असल्याचे समजते.

रविवारी भर दुपारी धनलक्ष्मी कॉलनीतील बालाजी काशिनाथ दंडगे यांच्या घरात चोरी झाली. दंडगे आपल्या व्यवसायानिमित्त बाहेर होते. चोरट्यांनी दुपारी 12 ते 5 वाजेच्या दरम्यान घराचे गेट आणि दाराचे कुलूप तोडले. घरातील पलंगाखाली ठेवलेल्या चावीने कपाट उघडून त्यातील 102 ग्रॅम सोन्याचे दागिने व 10 तोळे चांदीचे दागिने चोरले. यांची किंमत पोलिसांच्या नोंदीनुसार 3 लाख 26 हजार रुपये आहे. दंडगे यांच्या पत्नीने मकर संक्रांतीसाठी हे दागिने बँकेतून आणले होते.

शेजाऱ्यांनी संध्याकाळी घराचे कुलूप तोडलेले पाहिल्यानंतर दंडगे व पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

याचवेळी समोरच्या घरातील विकास बनसोडे हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. सोमवारी सकाळी घरी परतल्यावर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट व गल्ले फोडून 40 हजार रुपयांची रोख रक्कम व अर्ध्या तोळ्याचे दागिने चोरले.

सोमवारी (दि. 20) श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. मात्र श्वान चोरी झालेल्या घरांच्या आसपासच फिरत राहिले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

 पोलिसांच्या नोंदीतील सोन्याची कमी किंमत?
सध्याच्या बाजारभावानुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजार रुपये आहे. तरीही 102 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची किंमत फक्त 3 लाख 26 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे. इतकी कमी किंमत कशी काय ठरवली याचा खुलासा पोलिसांनी करणे गरजेचे आहे.

Previous Post

रॉंग साईडने आलेल्या मोटारसायकलस्वाराची महिलेला धडक

Next Post

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात उपविभागीय अधिकारी डव्हळे यांची याचिका दाखल

Next Post
धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या निलंबनाची कहाणी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात उपविभागीय अधिकारी डव्हळे यांची याचिका दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरुच; ६ लाखांहून अधिक मुद्देमालाची लांबवालांबव, ५ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

July 29, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना ५ लाखांची खंडणी मागत धिंगाणा!

July 29, 2026
 कमळाबाईच्या दरबारातला मॉडर्न भस्मासुर आणि निष्ठावंतांची गोची!

 कमळाबाईच्या दरबारातला मॉडर्न भस्मासुर आणि निष्ठावंतांची गोची!

July 29, 2026
धाराशिव शहरात गुटखा माफियावर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! शम्स चौकात १७.८२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा

धाराशिव शहरात गुटखा माफियावर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! शम्स चौकात १७.८२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा

July 29, 2026
काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

July 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!