• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंदवा

जिल्हाधिकाऱ्यांना प्रशांत साळुंके यांचे पुन्हा स्मरणपत्र; कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

admin by admin
August 9, 2026
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंदवा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील एका नगरसेवकाने बांधकाम परवानगी न घेता कथितरीत्या अवैध बांधकाम केल्याची तक्रार करूनही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारकर्ते प्रशांत साळुंके यांनी केला आहे. या प्रकरणी निष्पक्ष कारवाईच्या मागणीसाठी यापूर्वी निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याने साळुंके यांनी ७ ऑगस्ट रोजी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र दिले असून, संबंधितांविरुद्ध एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.

साळुंके यांनी संबंधित बांधकामाबाबत २ जून रोजी धाराशिव नगर परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने ८ जून रोजी संबंधितांना नोटीस बजावल्याचे सांगण्यात आले. मात्र, या नोटीसची अंमलबजावणी १३ जुलै रोजी झाल्याचा दावा साळुंके यांनी केला आहे.

नोटीसनुसार संबंधितांना सात दिवसांत खुलासा सादर करणे अपेक्षित होते. मात्र, संबंधितांनी खुलासा करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ मागितली आणि नगर परिषद प्रशासनाने ती मंजूर केली. ही वाढीव मुदत ५ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याचा आरोप साळुंके यांनी केला आहे.

मुदतवाढ देण्याच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह

अवैध बांधकामाच्या प्रकरणात नोटीस बजावल्यानंतर वारंवार मुदतवाढ देता येते का, असा सवाल साळुंके यांनी उपस्थित केला आहे. कायद्यानुसार अशी मुदतवाढ पुन्हा देता येत नसल्याचा दावा त्यांनी केला असून, नगर परिषद प्रशासन संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम (एमआरटीपी) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, यापूर्वीही कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात कुठेही आत्मदहन करण्याचा इशारा प्रशांत साळुंके यांनी दिला होता. त्यानंतरही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देत संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.

Previous Post

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निवडीवरून भाजपमध्ये नाराजी; मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप

Next Post

धाराशिव MIDC परिसरात तुफान राडा! जुन्या वादातून भावावर लोखंडी रॉड अन् कोयत्याने प्राणघातक हल्ला

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव MIDC परिसरात तुफान राडा! जुन्या वादातून भावावर लोखंडी रॉड अन् कोयत्याने प्राणघातक हल्ला

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यातील शिराढोण शिवारात वृद्धावर तुफान हल्ला!

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव MIDC परिसरात तुफान राडा! जुन्या वादातून भावावर लोखंडी रॉड अन् कोयत्याने प्राणघातक हल्ला

August 9, 2026

Recent Posts

  • कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
  • धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!
  • मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल
  • कळंब तालुक्यातील शिराढोण शिवारात वृद्धावर तुफान हल्ला!
  • धाराशिव MIDC परिसरात तुफान राडा! जुन्या वादातून भावावर लोखंडी रॉड अन् कोयत्याने प्राणघातक हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!