धाराशिव तालुक्यातील तेरणा धरणात मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्यामुळे धरणात पाणीसाठा वाढून शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ता. २३ जुलै रोजी धरणात एकूण ३२.१७% पाणीसाठा जमा झाला असून, पाण्याचा प्रवाह सुरूच असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती शाखा अभियंता धनंजय वरपे यांनी दिली.
धाराशिव शहर आणि तेर, ढोकी, येडशी, तडवळा ही मोठी गावे या धरणावर अवलंबून असल्याने या गावांचा पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यांद्वारे शेतीला पाणीपुरवठा केला जात असून, यामुळे सुमारे १६५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
तेरणा धरणाची एकूण साठवण क्षमता २०.५५४ दशलक्ष घनमीटर असून, त्यातील ०.८९६ दलघमी मृत साठा आहे. धरण भरल्यास शेतकरी बागायती शेती करू शकतील आणि धरण परिसरातील विहीरी व कुपननलिकांच्या पाणी पातळीतही वाढ होईल.
- तेरणा धरण: धाराशिव तालुक्यातील सर्वात मोठे धरण
- पाणीसाठा: ३२.१७% (वाढ होण्याची शक्यता)
- फायदे:
- धाराशिव शहर आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा
- १६५२ हेक्टर क्षेत्र सिंचन
- बागायती शेतीसाठी पाणी
- विहीरी व कुपननलिकांच्या पाणी पातळीत वाढ