• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंबमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटात मारामारी; १६ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
August 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब  – ‘आमच्या महिलेकडे वाकून का बघतो’ या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मोठ्या मारामारीत झाले असून, एका गटाने जमून एका व्यक्तीला आणि त्याच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची घटना कळंब शहरातील बुरुड गल्लीत घडली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश बाबु कोरे (वय ३८, रा. बुरुड गल्ली, कळंब) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गणेश कोरे यांची पत्नी कचरा टाकण्यासाठी बाहेर आली होती. यावेळी खाटीक गल्लीतील काही तरुणांनी, ‘तू आमच्या बाईकडे वाकून का बघतोस?’ अशी विचारणा करत गणेश कोरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आरोपी सोहेल बशीर बागवान, शोएब कुरेशी, हकीम कुरेशी, अनवर सलीम कुरेशी आणि इतर १० ते १२ जणांनी गैरकायदेशीर जमाव जमवून गणेश कोरे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून कोरे यांचे नातेवाईक भांडण सोडवण्यासाठी आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर गणेश कोरे यांनी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १६ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार मारहाण, गैरकायदेशीर जमाव जमवणे, शिवीगाळ आणि धमकी देणे याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

भूममध्ये वाईन शॉप चालकाकडे खंडणीची मागणी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Next Post

उमरगा तालुक्यातील माडज गावात दोन घरे फोडून ६० हजारांचा ऐवज लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा तालुक्यातील माडज गावात दोन घरे फोडून ६० हजारांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!