कळंब : छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे मोटरसायकलची डिक्की फोडून अंदाजे 50,000 रुपये रोख आणि चेकबुक लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दि. 26 मार्च 2025 रोजी दुपारी 12.35 वाजता घडली.
फिर्यादी उत्तरेश्वर बापुराव शिंगणापुरे (वय 59 वर्षे, रा. जिजाउ नगर ढोकी रोड, कळंब) यांनी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटरसायकल (क्रमांक एमएच 25 डब्ल्यु 1482) ची डिक्की लॉक न करता त्यामध्ये अंदाजे 50,000 रुपये रोख आणि चेकबुक ठेवले होते. ज्ञात व्यक्तीने मोटरसायकलची डिक्की उघडून सदर रक्कम आणि चेकबुक चोरून नेले.
फिर्यादी उत्तरेश्वर शिंगणापुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कळंब पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास कार्यवाही करीत आहेत. नागरिकांनी मोटरसायकलची डिक्की लॉक करून ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.