• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग : श्री खंडोबाच्या यात्रेत बनावट हळद-खोबऱ्याचा सुळसुळाट

 भाविकांच्या आरोग्याला धोका!

admin by admin
December 20, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
नळदुर्ग : श्री खंडोबाच्या यात्रेत बनावट हळद-खोबऱ्याचा सुळसुळाट
0
SHARES
310
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर (नळदुर्ग) येथे प्रसिद्ध श्री खंडोबा आणि बाणाई यांचे  विवाहस्थळ आहे. सध्या सुरू असलेल्या यात्रोत्सवा दरम्यान भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दर रविवारी भरणारी यात्राही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मात्र या उत्साहावर विरजण टाकणारी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

मंदिराच्या आवारात असलेल्या दुकानांमध्ये बनावट हळद आणि निकृष्ट दर्जाचे खोबरे सर्रास विकले जात आहे. श्री खंडोबाच्या मंदिरात भंडारा (हळद) आणि खोबरे उधळण्याची प्रथा आहे. याचा गैरफायदा घेत काही दुकानदार हळदी ऐवजी पिवळा रंग विकत आहेत. हा रंग त्वचेसाठी घातक असून यामुळे भाविकांना त्वचेचे आजार होत आहेत. डोळ्यात गेल्यास डोळे चरचरणे, जळजळ होणे असे त्रास होत आहेत. तसेच निकृष्ट दर्जाचे खोबरेही भाविकांच्या माथी मारले जात आहे.

या गंभीर प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली असता, त्यांनी हे अन्न व भेसळ प्रशासन विभागाचे काम असल्याचे सांगून हात झटकले. तर अन्न व भेसळ प्रशासन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकणाऱ्या या यंत्रणांमुळे भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.

या यात्रोत्सवात बनावट हळद आणि खोबऱ्याच्या विक्रीला आवर घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या या दुकानदारांवर आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तात्काळ या गंभीर प्रकाराची दखल घेऊन भाविकांच्या आरोग्याचे रक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

उमरगा : ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

Next Post

बीडमधील सरपंच हत्याकांड प्रकरणी एसआयटी व न्यायालयीन चौकशीची घोषणा

Next Post
बीडमधील सरपंच हत्याकांड प्रकरणी एसआयटी व न्यायालयीन चौकशीची घोषणा

बीडमधील सरपंच हत्याकांड प्रकरणी एसआयटी व न्यायालयीन चौकशीची घोषणा

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group