लोहारा – लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील दोन तरुणाकडे गावठी पिस्टल ( बंदूक ) सापडले असून, लोहारा पोलिसांनी ते जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सालेगाव येथली इसम नामे रणजीत कालीदास यादव, वय 27 वर्षे, सुरज रुपसेन देशपांडे, वय 19 वर्षे यांनी गावठी पिस्टल (बंदुक) व डबलबोर चे काडतुस आणले आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने यावर लोहारा पोलीस ठाण्याचे पथकाने सदर ठिकाणी जावून 19.15 वा नमुद इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात 20, 500 ₹ किंमतीचे गावठी पिस्टल(बंदुक) व डबलबोरचे काडतुस मिळून आले. यावर पथकाने त्यास अटक करुन त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्टल व डबलबोरचे काडतुस जप्त करुन त्यांचेविरुध्द पोलीस ठाणे लोहारा येथे गुरनं 153/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, भारतीय न्याय सहिंता कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
लोहारा :आरोपी नामे- ईमाम महेबुब शेख, वय 65 वर्षे, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव, मतीन मेसान शेख, वय 34 वर्षे, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.02.07.2024 रोजी 12.10 ते 12.50 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे टाटा मॅजीक क्र एमएच 13 एसी 8074 व टाटा मॅजीक क्र एमएच 45 एसी 2459 ही दोन्ही वाहने लोहारा ते मार्डी जाणारे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये तुळजापूर पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.