• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘सरकारे आयेंगी, जायेंगी, ये देश रहना चाहिए…

महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

admin by admin
April 18, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
अतिवृष्टीने नुकसान: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! मदतीची अपेक्षा फोल, आकडेवारीच्या खेळात सरकारची दिशाभूल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर धाराशिवचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. “महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली राजकीय षडयंत्र रचून लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव लोकशाहीनेच हाणून पाडला,” असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक आणि ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून या संदर्भात आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. सत्ताधाऱ्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, “स्वतःच्या घटत्या जनाधारामुळे काहीही करून सत्तेत राहण्यासाठी लोकसभेच्या जागा वाढवून लोकशाही आणि विरोधकांची गळचेपी करण्याचे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे आज संसदेत उधळून लावण्यात आले आहेत.”

‘आतातरी बोध घेऊन लोकहिताचे काम करावे’

सरकारला खडेबोल सुनावताना खासदार निंबाळकर यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. “हा देश संविधानावर चालत आला आहे आणि यापुढेही चालू राहील. त्यामुळे सरकारने आतातरी यातून बोध घ्यावा आणि केवळ लोकहिताचेच काम करावे, एवढीच सदिच्छा आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत.

अटलजींच्या कवितेचा संदर्भ

आपल्या प्रतिक्रियेची सुरुवात आणि शेवट करताना खासदार निंबाळकर यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या संसदेतील गाजलेल्या भाषणातील ओळीचा जाणीवपूर्वक संदर्भ दिला आहे. ‘सरकारे आयेगी जाएगी, ये देश रेहना चाहिए,’ या ओळीची आठवण करून देत त्यांनी सत्ताधाऱ्यांना देशाचे आणि लोकशाहीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Previous Post

जयंती मिरवणुकीत कर्णकर्कश ‘डीजे’चा दणदणाट; आयोजकांसह जालना, पुणे, सोलापूरच्या साऊंड मालकांवर ३ गुन्हे दाखल

Next Post

महिला आरक्षण: २०२३ च्या कायद्यात आणि २०२६ च्या प्रस्तावित विधेयकात नेमका फरक काय?

Next Post
महिला आरक्षण: २०२३ च्या कायद्यात आणि २०२६ च्या प्रस्तावित विधेयकात नेमका फरक काय?

महिला आरक्षण: २०२३ च्या कायद्यात आणि २०२६ च्या प्रस्तावित विधेयकात नेमका फरक काय?

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!